मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: डोक्यावर भगवा स्कार्फ अन् जय श्री रामचे नारे; विनाहेल्मेट सुसाट बुलेट पळवत नवनीत राणांनी साजरी केली रामनवमी

VIDEO: डोक्यावर भगवा स्कार्फ अन् जय श्री रामचे नारे; विनाहेल्मेट सुसाट बुलेट पळवत नवनीत राणांनी साजरी केली रामनवमी

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा एक नवीन व्हिडिओ रामनवमीच्या दिवशी समोर आला आहे. डोक्यावर भगवा स्कार्फ गुंडाळून त्या बुलेटवर स्वार झाल्या आहेत

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा एक नवीन व्हिडिओ रामनवमीच्या दिवशी समोर आला आहे. डोक्यावर भगवा स्कार्फ गुंडाळून त्या बुलेटवर स्वार झाल्या आहेत

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा एक नवीन व्हिडिओ रामनवमीच्या दिवशी समोर आला आहे. डोक्यावर भगवा स्कार्फ गुंडाळून त्या बुलेटवर स्वार झाल्या आहेत

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती 30 मार्च : आज रामनवमीनिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणाही रामाच्या भक्तीत रंगल्या आहेत. बुलेटवर स्वार असलेल्या खासदार नवनीत राणा भगवा स्कार्फ परिधान करून जय श्री रामचा नारा देताना दिसल्या. नवनीत राणा आपण राजा श्री राम भक्त असल्याच्या घोषणा देत आहेत. याआधी त्यांनी हनुमान चालिसाबाबत तत्कालीन उद्धव सरकारशीही खडाजंगी केली होती.

..तेव्हा मी हातातला माईक घेऊन सत्तारांना मारण्यासाठी गेलो, खैरेंनी सांगितला 'तो' किस्सा

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा एक नवीन व्हिडिओ रामनवमीच्या दिवशी समोर आला आहे. डोक्यावर भगवा स्कार्फ गुंडाळून त्या बुलेटवर स्वार होऊन सांगत आहे की, आम्ही अखंड विश्वाचा राजा श्री रामचे भक्त आहोत... आम्हाला पराभवाची चिंता नाही..आणि आम्ही विजयाचा उल्लेख करत नाही... जय श्री राम. असं म्हणून खासदार नवनीत राणा हेल्मेट न घालता वेगाने बुलेट चालवताना दिसतात.

खासदार नवनीत राणा यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, मात्र लोक त्यांच्या हेल्मेट न घालण्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. याआधीही खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा बुलेटवर फिरताना दिसले होते. यादरम्यान पती रवी राणा यांनी हेल्मेट घातलं नव्हतं, त्यामुळे खासदार नवनीत राणा यांना खूप ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र यावेळीही त्यांनी वाहतुकीच्या नियमांकडे फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही.

तो व्हिडीओ शेअर करत खासदार नवनीत राणा यांनी ट्विटरवर लिहिलं होतं की, 'पूर्ण 5 दिवस मेळाघाट भागातील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्यासाठी दुचाकीवरून गावोगाव फिरत समस्या ऐकून घेत आहे.' याशिवाय खासदार नवनीत राणा यांनी आणखी एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये त्या आदिवासींच्या तालावर डान्स स्टेप्स करत होत्या. यावेळी मागे उभा असलेले पती रवी राणा ढोल वाजवताना दिसले.

First published:
top videos

    Tags: Navneet Rana, Ram navmi