जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ..तेव्हा मी हातातला माईक घेऊन सत्तारांना मारण्यासाठी गेलो, खैरेंनी सांगितला 'तो' किस्सा

..तेव्हा मी हातातला माईक घेऊन सत्तारांना मारण्यासाठी गेलो, खैरेंनी सांगितला 'तो' किस्सा

अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे

अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे

काही दिवसांपूर्वीच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे. यावर बोलत असताना खैरे यांनी आपला एक जुना किस्सा सांगितला.

  • -MIN READ Hingoli,Hingoli,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 30 मार्च :   काही दिवसांपूर्वीच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे. यावरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. एमआएएमने या नामांतरला विरोध केला आहे. तर भाजप, मनसे, ठाकरे गट, शिवसेना इतर हिंदुत्ववादी पक्ष नामांतराचं जोरदार समर्थन करत असल्याचं पहायला मिळत आहेत. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एक किस्सा सांगितला आहे. या किस्स्यामुळे खैरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, ते हिंगोलीमध्ये बोलत होते. नेमकं काय म्हणाले खैरे ?  औरंगाबाद शहराचं नामांतर आता छत्रपती संभाजीनगर झालं आहे. शिवसेनेची ही मागणी फार पूर्वीपासूनची होती, असं म्हणत खैरे यांनी एक जुना किस्सा सांगितला. काही वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला खैरेंसोबत अब्दुल सत्तार देखील उपस्थित होते. खैरे यांनी या कार्यक्रमात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानंतर संभाजीनगर म्हणू नका औरंगाबादच म्हणा असं अब्दुल सत्तार यांनी खैरेंना म्हटलं. त्यानंतर आपण हातातील माईक घेऊन त्यांना मारण्यासाठी सत्तारांच्या अंगावर धावून गेलो होतो असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते हिंगोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यापूर्वी न्यायालयाने सरकारला कधीच नपुंसक म्हटलं नव्हतं; त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी.., अजित पवारांचा खोचक टोला     नामांतराचा नवा प्रस्ताव   उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. शिंदे, फडणवीस सरकारने आधीचा प्रस्ताव रद्द करून पुन्हा नामांतराचा नवा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला केंद्राने परवानगी दिल्यानंतर औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात