जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना आमदार देशमुखांची जीभ घसरली; थेट शिवराळ भाषेत टीका

किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना आमदार देशमुखांची जीभ घसरली; थेट शिवराळ भाषेत टीका

किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना आमदार देशमुखांचा तोल घसरला

किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना आमदार देशमुखांचा तोल घसरला

बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांची भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना जीभ घसरली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 17 जानेवारी : ठाकरे गटाचे बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख तब्बल तीन तास चौकशीनंतर अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयाबाहेर आले. भारतीय जनता पक्ष अमराठी मराठी माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठी माणसांच्या अँटी करप्शनच्या चौकशा लावत असल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी चौकशीनंतर केला आहे. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर बोलताना देशमुख यांची जिभ घसलेली पाहायला मिळाली. दरम्यान, आमदार नितीन देशमुख कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. काय म्हणाले नितीन देशमुख? ज्या पद्धतीने माझी चौकशी झाली? तसे प्रश्न तुम्ही भाजपच्या लोकांनी विचारणार का? भाजप नेते किरीट सोमय्यांकडे कोट्यवधी रुपये कुठून आले? इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा सोमय्या यांना काय अधिकार आहे? यावेळी किरीट सोमय्या यांच्यावर बोलताना देशमुख यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केली. सोमय्या यांनी नारायण राणे, खासदार भावना गवळी यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता? मग आता ते गप्प का आहेत? असा सवालही देशमुख यांनी उपस्थित केला. वाचा - निवडणूक आयोग आणि शिंदे गटाची साठ गाठ झाली आहे का?, सुषमा अंधारेंची शिंदे गटावर टीका ठाकरे गटाचे तिसरे आमदार एसीबीच्या रडारवर राजन साळवी, वैभव नाईक व आता उद्धव ठाकरे गटाचे तिसरे आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवार आले आहेत. त्यांना संपत्तीच्या चौकशीसाठी एसीबीने नोटीस पाठवली होती. याप्रमाणे आमदार देशमुख यांची अमरावती परिक्षेत्र कार्यालयात चौकशी झाली. यापूर्वी एसीबीकडून राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना एसीबीने नोटीस पाठवली होती. एसीबीची नोटीस आलेले नितीन देशमुख ठाकरे गटाचे तिसरे आमदार आहेत. एकापाठोपाठ एका आमदाराला तपास यंत्रणा नोटीस पाठवत असल्याने ठाकरे गटात खळबळ माजली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

शिंदे गट आणि भाजपकडून ब्लॅकमेलिंग : अरविंद सावंत शिंदे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संपत्तीच्या चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली. यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी अमरावतीमध्ये प्रतिक्रिया दिली. शिंदे गट आणि भाजपकडून ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप खासदार सावंत यांनी केला आहे. भ्रष्टाचारी वृत्तीची माणसे उलट सज्जन माणसाला भ्रष्टाचारी करण्याचा प्रयत्न करत आहे. आमदार नितीन देशमुख यांना नोटीस देऊन ठाकरे गटाला ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. निवडणुकासमोर येतील तसं ठाकरे गटाच खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होणार आहे. नितीन देशमुख यांच्याकडे काही कागदपत्रे सापडणार नाही. आता भाजप व शिंदे गटाची सर्व सामान्य माणसाला घृणा यायला लागली असल्याची टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात