बुलढाणा, 25 जुलै, राहुल खंडारे : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटल्यानं ही बस राजूर घाटात पलटी झाली आहे. या बसमधून एकूण 55 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांकडून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. बसचं ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
Andheri Landslide : मोठी बातमी! अंधेरीमध्ये लँडस्लाईड; लोक झोपेत असतानाच कोसळली दरडबसचं ब्रेक फेल झाल्यानं अपघात मलकापूर -बुलढाणा या बसमधून 55 प्रवासी प्रवास करत होते, बस राजूर घाटात आल्यानंतर बसचं ब्रेक फेल झालं. बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. बस घाटात पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली.