अक्षय पुंडेकर, प्रतिनिधी
अमरावती, 27 फेब्रुवारी: सध्या उन्हाचे चटके बसू लागले असून मार्च महिन्यापासून उन्हाची तीव्रता आणखी वाढेल. त्यामुळे रणरणत्या उन्हापासून गारवा मिळावा वा यासाठी श्रीमंत वर्गाची ‘एसी’ला तर सर्व सामान्य कुटूंब कूलरलाच पसंती देत आहे. मात्र कूलरसाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीत भाववाढ झाल्याने कूलरच्या किमतीही वाढल्या आहेत. कुलरच्या किमती वाढल्याने अमरावती शहरात नामांकित कंपन्यांचे विविध आकाराचे कूलर उपलब्ध असताना ‘डेझर्ट कूलर’ची मागणी वाढली आहे.
कूलिंग साहित्य महागले
यंदाच्या सिजनमध्ये एक हजार रुपयापासून ते 15 हजार रुपयांतपर्यंतचे कूलर्स बाजारात उपलब्ध आहे. डेझर्ट कूलर बनविण्यासाठी लागणारी मोटर, फॅन, पत्रा, स्टिल, वाळा (ताट्या) आदी साहित्यामध्ये भाव वाढ झाल्याने कूलरच्या किमती 500 ते 800 रुपयांनी वाढल्या आहेत. कॉपर आणि लोखंडाचे दर वाढले आहेत. त्याचा फटका बाजाराला बसला आहे. कूलर मध्ये असलेल्या मोटारीच्या किमती वाढल्या आहेत. तसेच मजूरीचे दर देखील वाढल्याने किमंत वाढीशिवाय पर्याय नाही. ब्रॅंडेड कूलरच्या बाबतीत देखील हीच स्थिती झाली आहे.
स्टील, तांबे महागल्याचा फटका
स्टील आणि तांबेसारख्या धातूंच्या किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्च देखील वाढला आहे. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि एसीच्या किमती 5 ते 6 टक्क्यांनी वाढ झाली असून, यंदा विक्रीत चांगली वाढ देखील झाली आहे. फेब्रुवारीमध्येच विक्री वार्षिक 50 टक्के वाढली आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या सिजनमध्ये कुलरच्या साहित्याच्या किमतीत वाढ झाली असून कारागीर मिळत नसल्याने त्यांच्या मजुरीतही वाढ करावी लागत आहे. यामुळे कूलरच्या किमती वाढल्या आहेत, अशी खंत कुलर विक्रेता करण मालवीय यांनी व्यक्त केली आहे.
… आलं धोक्याचं सरकार! शेतकऱ्याने मांडल्या कापूस उत्पादकांच्या व्यथा, पाहा Video
इंधन दरवाढीचा सुद्धा होणार परिणाम
या सर्व स्थितीत आता इंधन दरवाढीची भर पडणार आहे. इंधनाचे भाव वाढल्याने त्याचे परिणाम आता वाहतूक खर्चावर होणार आहेत. वाहतूक खर्च वाढल्यास या सर्व वस्तूच्या किमतीत आणखी काही टक्क्यांची वाढ होणार आहे. अमरावती शहरात उन्हाचा पारा 38 अंश सेल्सिअस दरम्यान गेल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशात थंड हवेशिवाय अमरावतीसह जिल्ह्यात उन्हाळा काढणे अशक्य आहे. कुलर खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी वाढली आहे.
Nashik News : खर्चही निघेना, कांदा उत्पादकांच्या डोळ्यात 'अश्रू', शेतकऱ्यांचा भावूक सवाल Video
स्थानिक व्यवसायिकांच्या कूलरला मागणी
शहरात ब्रॅंडेड कुलर उपलब्ध असले तरी बाजारपेठांमध्ये ब्रॅंड नसलेल्या, स्थानिक व्यावसायिकांनी बनविलेल्या कुलरला देखील चांगली मागणी आहे. दोन ते अडीच फुटांपासून तर आठ फुटांपर्यंत कुलर उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती अडीच हजारांपासून सात हजारांपर्यंत आहेत. साहित्य आणि मजुरी वाढल्याने कुलरच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.