अमरावती, 10 मार्च : राज्यभरात तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. मात्र, अमरावतीमध्ये मनसेच्या शिवजंयती रॅलीला गालबोट लागले आहे. फटाक्यांची आतषबाजी करत असताना शेजारी उभ्या असलेल्या इमारतीला आग लागली.
मनसेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शहरातील राजकमल चौकात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी हजर होते. आरती सुरू असताना कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.
अमरावती - मनसेच्या शिवजयंती रॅलीमध्ये फटाक्याची आतिषबाजी, बाजूच्या इमारतीला लागली आग pic.twitter.com/1uXGfPo0bE
— News18Lokmat (@News18lokmat) March 10, 2023
त्यामुळे फटाक्यांमुळे शेजारी असलेल्या इमारतीच्या छतावर आग लागली. बघता बघता काही क्षणात आगीने रौद्ररुपधारण केलं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे.
('गुम है किसी के प्यार मैं' मालिकेच्या सेटला भीषण आग; घटनेवेळी 'हे' मराठी कलाकारही होते सेटवर?)
छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदामाला आग
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये गोडाऊनला मोठी आग लागली आहे. पैठणच्या बिडकीन गावातील शेकटा रोडवरील गोडाऊनला आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी बिडकीन पोलीस दाखल आणि आग विझविण्यासाठी खाजगी टँकर दाखल झाले आहे. आगीचे प्रमाण अधिक असल्याने अग्निशमन दलाच्या बंबाना पाचारण करण्यात आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.