मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Amravati Accident News Video : वळणावर घात झाला, भरधाव ट्रॅक्टर -ट्रॉली पलटी, 22 विद्यार्थी जखमी LIVE VIDEO

Amravati Accident News Video : वळणावर घात झाला, भरधाव ट्रॅक्टर -ट्रॉली पलटी, 22 विद्यार्थी जखमी LIVE VIDEO

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात उघड झाला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात उघड झाला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात उघड झाला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

संजय शेंडे (अमरावती), 25 फेब्रुवारी : आपण नेहमी ऐकत आलो आहे वळण असल्यावर वाहन सावकाश चालवावे. वळणावर वाहनाचा वेग जर कमी नसेल तर दुर्घटना होण्याची शक्यता असते. परंतु वाहन चालकाला हे माहिती असूनही वाहन चालक भरधाव वेगात जात असेल तर अपघात होतोच. दरम्यान असाच एक प्रकार अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात उघड झाला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर जैनपूर येथे सुरू होते. मात्र शिबीराचा समारोप झाल्यानंतर चक्क विद्यार्थ्यांना एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसवून दर्यापूर येथे नेत होते. यादरम्यान वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी झाली व यात 22 विद्यार्थी जखमी झाले.

हे ही वाचा : कोळशात सापडला हिऱ्यासदृश्य दगड; पाहताच घेऊन फरार झाले अधिकारी, नंतर समोर आलं भलतंच सत्य

मात्र या ट्रॅक्टर- ट्रॉली पलटी झाल्याचा अपघाताचा व्हिडिओ हाती लागला आहे, अगदी वळण रस्त्यावर हा ट्रॅक्टर वेगाने जात असतांना ट्रॅक्टर पलटी झाला,सध्या अपघातातील दोघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

ब्रेकऐवजी चुकून दाबला एक्सीलेटर अन्

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, मुलगी रस्त्याच्या कडेला थोडा वेळ थांबताना दिसत आहे आणि थोड्या वेळाने ही मुलगी उजवीकडे वळते, जिथे तिच्या डाव्या बाजूला एक मोठा नाला आहे. तिथे ही मुलगी एक्सलेटरला खूप वेगाने फिरवते, आणि नाल्यात जाऊन पडते. ज्यामुळे ती या भीषण अपघाताची बळी ठरते. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : धक्कादायक! लग्नासाठी सजली पण बोहल्यावर जाण्याऐवजी सरणावर गेली, पहा PHOTOS

gieddeee या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर खूप प्रतिक्रियादेखील येत आहेत. अनेकजण या व्हिडीओविषयी खिल्लीही उडवत आहे. तर काहीजण मुलींच्या गाडी चालवण्याविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करत आहेत. तर ते या तरुणीच्या खराब ड्रायव्हिंगला ट्रोल करताना कॉमेंट बॉक्समध्ये दिसत आहेत. असे व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी काही वेळातच व्हायरल होतात आणि धुमाकूळ घालू लागतात.

First published:
top videos

    Tags: Amravati, Live video, Student