लखनऊ 24 फेब्रुवारी : पैसा, दागिने किंवा मौल्यवान वस्तू अचानक सापडल्या तर कोणाचं मन कसं पालटेल हे सांगता येत नाही. अशा वस्तू मिळाल्यावर त्या घेऊन पलायन केल्याच्या घटना आपण बऱ्याचदा ऐकतो, वाचतो. सध्या उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. येथील एका प्रकल्पात कोळशाचं वर्गीकरण सुरू असताना दोन किलो वजनाचा हिऱ्यासारखा चमकदार दगड सापडला. प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी तपासणीच्या नावाखाली तो ताब्यात घेतला. मात्र या अधिकाऱ्यांच्या मनातील विचार बदलले आणि ते दगड घेऊन फरार झाले. गुरुवारी ही घटना समोर आली असून, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथील परिछा थर्मल पॉवर प्लांट अर्थात पीटीपीपीमध्ये कोळशाचं वर्गीकरण सुरू असताना दोन किलो वजनाचा हिऱ्यासारखा चमकणारा दगड सापडला. तो मिळवण्यासाठी तेथे उपस्थित मजूर एकमेकांना भिडले. यानंतर गोंधळ वाढल्याने कंपनीशी संबंधित इंजिनिअर आणि अधिकाऱ्यांनी तपासाच्या नावाखाली तो हिऱ्यासदृश दगड ताब्यात घेतला. पण या अधिकाऱ्यांच्या मनातले विचार पालटले आणि ते हा दगड घेऊन फरार झाल्याचं समोर आलं. मात्र नंतर झाशीपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर बेतवा नदीच्या काठी हा प्लांट असून, तो उत्तर प्रदेश वीज निर्मिती निगम या राज्य सरकारच्या उपक्रमाच्या मालकीचा आहे. शॉपिंग मॉलमध्ये चोरी करून महिलेनं कपड्यांमध्ये लपवलं सामान; झडती घेताच सगळेच शॉक, VIDEO दरम्यान, ``हा दगड हिरा असण्याची शक्यता कमी असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं आहे. हा हिऱ्यासदृश दगड दोन कॅरेटचा आणि नाजूक आहे. यात हिऱ्याचे गुणधर्म दिसत नाहीत. हिरा खूप टणक असतो आणि तो दहा कॅरेटपासून सुरू होतो. हा दगडासारखा आहे. पण आम्ही सरकारमान्य लॅबमध्ये या हिऱ्यासदृश दगडाच्या उर्वरित अवशेषांचं परिक्षण करणार आहोत,`` असं या प्लांटचे मुख्य महाव्यवस्थापक मनोज सचान यांनी सांगितलं. सचान पुढे म्हणाले की, ``भारत सरकारची आउटसोर्स कंपनी असलेल्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात क्यूसीआयचे कर्मचारी प्लांटमध्ये पाठवल्या जाणाऱ्या कोळशाची गुणवत्ता तपासत होते. सोमवारी मजुरांना झारखंडमधून नुकत्याच आलेल्या कोळसा रेकच्या वॅगनमधून दोन किलो वजनाचा काचेसारखा चमकणारा दगड सापडला. यानंतर मजुरांनी तो दगड फोडला आणि तुकडे घेऊन पळ काढला. या वादादरम्यान कोणीतरी व्हिडिओ बनवून साइट इन्चार्जला याविषयी माहिती दिली. माहिती मिळताच साइट इन्चार्ज घटनास्थळी दाखल झाले आणि कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून या दगडाचे उरलेले तुकडे आपल्या घरी नेले. दुसरीकडे सायंकाळी थर्मल प्लांटचे एक कार्यकारी अभियंता भूपेंद्र सिंह क्यूसीआयमध्ये काम करणाऱ्या अमित सिंह यांच्यासमवेत साईट इन्चार्जच्या घरी पोहोचले. त्यांनी तपासणीच्या नावाखाली तो दगड ताब्यात घेतला आणि त्यानंतर हे सर्वजण फरार झाले. गुरुवारी ही घटना समोर आल्यानंतर झाशीतील बडागाव पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 379 (चोरी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.`` ``याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे,`` असं बडागाव पोलीस ठाण्याचे प्रमुख विनय दिवाकर यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.