मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Amravati Violence: अमरावती हिंसाचार प्रकरणात मोठी अपडेट, सायबर सेलच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे

Amravati Violence: अमरावती हिंसाचार प्रकरणात मोठी अपडेट, सायबर सेलच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे

Amravati Violence: अमरावती येथे झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आता पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 17 नोव्हेंबर : अमरावती येथे झालेल्या हिंसाचार (Amravati Violence) प्रकरणात पोलिसांनी आपला तपास सुरू करत कारवाई सुरू केली. त्यातच आता पोलिसांच्या सायबर सेलच्या (Cyber Cell) हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात बनावट सोशल मीडिया अकाऊंट्सचा वापर करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. (Maharashtra Cyber Cell has found 36 social media accounts which were fake and were used to create and circulate fake messages)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सायबर सेलला 36 सोशल मीडिया अकाऊंटस आढळून आली आहेत जी बनावट आहेत. ही सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचाराबद्दलचे फेक मेसेज तयार करुन फॉरवर्ड करण्यासाठी वापरण्यात आले. आता या संबंधित सोशल मीडिया अकाऊंट्सचे आयपी अॅड्रेस सायबर पोलीस ट्रेस करत आहेत. याच सोशल मीडिया अकाऊंट्सवरील पोस्टमुळे महाराष्ट्रात हिंसाचार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सोशल मीडिया युजरने त्रिपुरा हिंसाराचाबाबत चुकीची माहिती पसरवली. तसेच धर्मविरोधी आणि चिथावणीखोर संदेश प्रसारित केले. इतकेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द सुद्धा वापरले.

आता पोलीस पथक या संबंधित सोशल मीडिया अकाऊंट्सची माहिती आयपी अँड्रेसद्वरे ट्रेस करत आहेत. हे सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स हे बनावट होते.

त्रिपुरात (Tripura) घडलेल्या अत्याचाराच्या प्रकारानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी (12 नोव्हेंबर 2021) राज्यातील विविध भागांत निषेध मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर 13 नोव्हेंबर रोजी अमरावती बंदची (Amravati bandh) हाक देण्यात आली होती. अमरावती शहर बंदला हिंसक वळण (violence during Amravati bandh) लागल्याचं पहायला मिळालं. जमावाकडून दुकानांवर दगडफेक (stone pelting) आणि तोडफोड करण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.

वाचा : मालेगाव हिंसाचार प्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा

त्रिपुरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता, मात्र या मोर्चाला गालबोट लागलं होतं. या मोर्चाला हिंसक वळण आलं तर गाड्या व 20 ते 25 दुकानाची तोडफोड करण्यात आली होती. याचाच निषेध म्हणून 13 नोव्हेंबर रोजी अमरावती शहर बंदचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे वतीने करण्यात आले होते. याच बंद दरम्यान हिंसाचार झाला होता.

अमरावतीत संचारबंदी, इंटरनेट बंदचा आजचा पाचवा दिवस

अमरावती शहरात जो हिंसाचार उसळला त्यामुळे शहरात गेल्या पाच दिवसापासून संचार बंदी लावण्यात आलेली आहे. तसेच शहरातील सर्व इंटरनेट सेवा पूर्णता बंद करण्यात आली आहे, यामुळे शहरातील बँक पूर्णपणे बंद आहेत. सर्व ऑनलाईन व्यवहार ठप्प झालेले आहेत. सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून आज दुपारी बारा ते चार या वेळात संचार बंदीमध्ये चार तासाची सूट देण्यात आलेली आहे. मात्र संचारबंदी व इंटरनेट सुविधा बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात झळ पोहोचत आहे.

First published:

Tags: Amravati