नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : देशात सध्या कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी अजूनही नव्या लोकांना कोरोना होण्याची संख्या म्हणावी तेवढी आटोक्यात आली नाही. शिवाय सणासुदीच्या दिवसांमध्ये लोकांनी कोरोनात पाळायच्या नियमांची पायमल्ली करून गर्दी केल्यानं आता पुन्हा एकदा वेगानं हा संसर्ग पसरून दुसरी लाट भयंकर रुप घेणार का? अशी एकीकडे चिंता व्यक्त केली जात असताना आता धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. शात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे परंतु अद्याप धोका टळला नाही. बर्याच राज्यात, कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वेगानं वाढत आहे. कोरोना साथीच्या विषयी माहिती गोळा करणारे शास्त्रज्ञांनी हा विषाणू प्रथम संक्रमित रूग्णांच्या फुफ्फुसांना नुकसान पोहोचवल्याचे समोर आले आहे. कोरोना झाल्यानंतर सर्वात जास्त धोका हा फुफ्फुसांना असतो. अनेकदा रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात त्यामुळे श्वसनासाठी त्रास होतो आणि रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. हरियाणा आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनामुळे रुग्णांच्या मृत्यूच्या तपासणीच्या वेळी हा खुलासा करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवणारे डॉ. राजेंद्र राय यांच्या मते, संक्रमित रूग्णांच्या छातीत हा संसर्ग दिसल्यानंतर त्यांच्या सीटीस्कॅन करण्यात आला. 75 टक्क्यांपर्यंत फुफ्फुसांमध्ये हा संसर्ग पसरला असेल तर त्यातून रुग्णाचे प्राण वाचवणं शक्य असतं मात्र त्यानंतर हे आव्हानात्मक काम होत जातं.
With new 44,684 #COVID19 infections, India's total cases rise to 87,73,479. With 520 new deaths, toll mounts to 1,29,188
— ANI (@ANI) November 14, 2020
Total active cases 4,80,719 after a decrease of 3,828 in last 24 hrs
Total discharged cases 81,63,572 with 47,992 new discharges in last 24 hrs pic.twitter.com/6DNXB2plKo
हे वाचा- रेस्टॉरंट, जिम, प्रार्थनास्थळं? नव्या संशोधनानुसार ‘या’ ठिकाणी Covid ची शक्यता देशात गेल्या 24 तासांत 44 हजार 684 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत हा आकडा 87,73,479 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 520 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 4 लाख 80, 719 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या 3 हजार 828ने कमी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.