मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चक्क शौचालय गेले चोरीला? बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार

चक्क शौचालय गेले चोरीला? बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार

 जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाने जाऊ तेथे खाऊ या ब्रीद वाक्याचा वापर करुन चक्क एका गरीब कुटुंबाचा शौचालयच (Toilet) चोरुन नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित कुटुंबाने आपले शौचालय चोरीला गेल्याची फिर्याद शासनाकडे केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Chetan Patil

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 22 डिसेंबर : काही अनपेक्षित गोष्टी माणसाच्या डोक्याच्या पलीकडे असतात. त्या अनपेक्षित घटना आपल्याला फक्त चित्रपटांमध्ये (Films) पाहायला मिळतात. जसे की काही वर्षांपूर्वी मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांच्या 'जाऊ तेथे खाऊ' या चित्रपटात विहीर (well) गेली चोरीला या कथेचे किंवा हे टायटल ऐकून आपल्याला आश्चय वाटले होते. परंतू चित्रपटामधील हेच आश्चर्य आज प्रत्यक्षात पाहायला मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाने जाऊ तेथे खाऊ या ब्रीद वाक्याचा वापर करुन चक्क एका गरीब कुटुंबाचा शौचालयच (Toilet) चोरुन नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित कुटुंबाने आपले शौचालय चोरीला गेल्याची फिर्याद शासनाकडे केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांना चिक्कार पगार असताना सुद्धा अधिक पैसा कमावण्याच्या प्रयत्नात नियमावलीचे भान न ठेवता पैसा कमविणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून बरेच अधिकारी आणि कर्मचारी नियमित कायद्याचे उल्लंघन करून काम करत असतात. त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी अनेक गरीब कुटुंबांना शासनाकडून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागते. असाच एक अफलातून प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. झाडेगाव येथील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या मिलीभगतमुळे एका गरीब कुटुंबावर आपले शौचालय चोरी गेल्याची तक्रार करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा : दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलाला आईने शिकवली आयुष्यभराची अद्दल, लेक संतापला...

जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम झाडेगाव येथील एकनाथ सोळके आपल्या पत्नीसह शेती उपयोगी वस्तू तयार करणे, दुरुस्त करणे इत्यादी काम करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. सदर व्यक्ती गेल्या तीन-चार वर्षांपासून येथेच पालाची रावटी करून जीवन जगत आहे. त्या व्यक्तीजवळ स्वतःची किंवा अतिक्रमित कोणतीही अशी जागा नाही. तरीसुद्धा या व्यक्तीच्या नावावर ग्रामसेवक पवार आणि सरपंच यांनी मिलीभगत करून शौचालयाचे पैसे काढल्याचा दावा करण्यात आला आहे. एकनाथ सोळंके यांनी शौचालय करिता कोणताही अर्ज किंवा प्रस्ताव ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडे केलेला नसताना त्यांच्या शौचालय मंजूर होऊन प्रत्यक्षात बांधकाम न करता 12000 रुपये काढल्याचा आरोप एकनाथ यांनी केला आहे.

एकनाथ या व्यक्तीच्या नावाने बारा हजार रुपये काढून प्रत्यक्षात त्यास एक रुपयाही लाभ दिला गेला नाही. एकनाथ सारख्या अशा अजून काही निरक्षर नागरिकांची फसवणूक झाली तर नाही ना याचा जावईशोध वरिष्ठांनी घ्यावा, अशी मगणी स्थानिकांनी केली आहे.

First published: