मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलाला आईने शिकवली आयुष्यभराची अद्दल, लेकाची मात्र भयंकर प्रतिक्रिया

दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलाला आईने शिकवली आयुष्यभराची अद्दल, लेकाची मात्र भयंकर प्रतिक्रिया

हा मुलगा सतत दारूवरुन आईला मारहाण करीत होता. शेवटी संतापलेल्या आईने लेकाला शिक्षा दिली.

हा मुलगा सतत दारूवरुन आईला मारहाण करीत होता. शेवटी संतापलेल्या आईने लेकाला शिक्षा दिली.

हा मुलगा सतत दारूवरुन आईला मारहाण करीत होता. शेवटी संतापलेल्या आईने लेकाला शिक्षा दिली.

  • Published by:  Meenal Gangurde

पाटना, 22 डिसेंबर : बिहारमधील (Bihar News) आरामध्ये एका आईने हृदयावर दगड ठेवून सहा महिन्यांपूर्वी आपल्या दारूड्या मुलाला तुरुंगात पाठवलं होतं. सोमवारी 20 डिसेंबर रोजी विशेष न्यायालयाने त्याला 5 वर्षांच्या सक्त मजुरीच्या शिक्षेसह एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षेबद्दल ऐकून त्या आईला दु:ख झालं, मात्र मुलाला शिक्षा व्हावी ही तिची इच्छा होती. दैनिक भास्करने आई रामावती देवीशी संवाद साधला. रामावतीच्या तक्रारीनंतर दारूबंदी कायद्याअंतर्गत 25 वर्षाच्या आदित्य राज उर्फ बिट्टू याला शिक्षा झाली. रामावती देवीचे पती बिपिन बिहारी यादव ग्रामीण बॅंकेत मॅनेजर होते. काही वर्षांपूर्वी ते या पदावरुन निवृत्त झाले होते. त्यांच्या कुटुंबात दोन मुली आणि दोन मुली आहेत. आदित्य सर्वात लहान आहे. हे ही वाचा-मित्रांनीच दिली नराधमला साथ, जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार काय म्हणाल्या रामावती देवी.. त्यांनी सांगितलं की, तो माझ्यासोबत मारहाण करीत होता. दररोज पैशाची मागणी करायचा. जर पैसे दिले नाही तर वाईट शिव्या देत होता. मला खोलीत बंद करून गळा दाबण्याचा प्रयत्न करीत होता. गेल्या 10 वर्षांपासून तो दारू पितो. आपल्या मित्रांसह घराच्या शतावर दारूची पार्टी करीत होता. दारू प्यायल्या नंतर बाटल्या घरात ठेवत होता. ज्यामुळे रामावतीला घरात राहणं अवघड झालं होतं. आई जेवायला बसली तर तिच्या हातातील ताट खेचून घेत होता आणि वारंवार पैसे मागत होता. यापूर्वीदेखील दोन वेळा तो तुरुंगात गेला होता. आता करणार नाही असं सांगून तो सतत दारू पित होता. त्याची मारहाण दिवसेंदिवस वाढत होती. शेवटी आईने पोलिसांकडे त्याची तक्रार केली. आणि पोलिसांनी कारवाई करीत त्याला तुरुंगात टाकलं.

First published:

Tags: Bihar, Mother

पुढील बातम्या