जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अकोला: दर्शनासाठी आलेली महिला नदीत वाहून गेली; 20 तासानंतर घडला 'चमत्कार'

अकोला: दर्शनासाठी आलेली महिला नदीत वाहून गेली; 20 तासानंतर घडला 'चमत्कार'

अकोला: दर्शनासाठी आलेली महिला नदीत वाहून गेली; 20 तासानंतर घडला 'चमत्कार'

पूर्णा नदी दुधडी भरून वाहत असल्याने आजी दूरवर वाहून जात होत्या. हे पाहून संत गाडगे महाराज मंदिरावर उपस्थित असणाऱ्या एका युवकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो आजीबाईंना वाचवू शकला नाही

  • -MIN READ Akola,Akola,Maharashtra
  • Last Updated :

अकोला 23 जुलै : ‘देव तरी त्याला कोण मारी’ ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. ही म्हण प्रत्यक्षात खरी ठरल्याचं अकोल्यात पाहायला मिळालं. 21 जुलैला दुपारी अमरावती जिल्ह्यातील भटकुली तालुक्यातील पूर्णा नदीकाठावर असलेल्या ऋण मोचन येथील श्री.मुद्गलेश्वर मंदिराच्या घाटावरून अकोल्यातील आपताप येथील राणे नामक आजीबाई दर्शनासाठी गेल्या होत्या. अचानकपणे त्यांचा तोल जाऊन त्या पूर्णा नदीपात्रात पडल्या. मात्र पुढे जे घडलं ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. Maharashtra Rain News : तो पुन्हा कोसळधार, मुसळधार, संततधार, मेघगर्जनेसह येणार, मुंबई, पुणे, विदर्भात alert पूर्णा नदी दुधडी भरून वाहत असल्याने आजी दूरवर वाहून जात होत्या. हे पाहून संत गाडगे महाराज मंदिरावर उपस्थित असणाऱ्या एका युवकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो आजीबाईंना वाचवू शकला नाही. रात्री बराच वेळ त्यांचा शोध घेणं सुरूच होतं. 22 जुलैला सकाळी अकोल्यातील एन्डली गावातील नदीकाठी गावातील बकऱ्या घेऊन गेलेल्या युवकाला आजीचा आवाज ऐकू आला. त्यानंतर एन्डली येथील युवकांनी पाण्यात उड्या घेऊन त्यांना सुखरूप बाहेर काढलं. Swine Flu : 200 दिवसांत 142 रुग्ण, 2 आठवड्यातच 7 बळी; राज्यात कोरोनासह H1N1 Virus चा प्रकोप सतत वीस तास आजी नदीच्या पात्रात अडकून बसल्या होत्या. पुराचं पाणी आणि डोळ्यासमोरील मृत्यूचा थरार आजींनी प्रत्यक्ष 20 तास अनुभवला. या संपूर्ण घटनेनंतर “काळ आला पण वेळ आली नव्हती’ असंच म्हणावं लागेल. नदीच्या मध्यभागी 20 तास सलग अडकून असलेल्या आजींना बाहेर काढून एन्डलीच्या युवकांनी वेगळाच आदर्श प्रस्थापित केला आहे. समाजातून या युवकांचे कौतुक केलं जात आहे. सध्या आजी सुखरूप असून दर्यापूर येथील त्यांच्या मुलीला कळवून त्यांच्याकडे सुखरूप सुपूर्द केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात