मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : धक्कादायक! चारवेळा फवारणी करूनही कीड कायम, किटकनाशकंही ठरली फेल

Video : धक्कादायक! चारवेळा फवारणी करूनही कीड कायम, किटकनाशकंही ठरली फेल

कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या 99 नमुन्यांपैकी तीन नमुने फेल आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता आहे.

अकोला, 12 सप्टेंबर: जिल्ह्यातील सोयाबीन (Soybean) पिकांवर पाने खाणाऱ्या विविध प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. काही शेतकऱ्यांनी तर तीन चार वेळा फवारणी केली. मात्र, किडींचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यातच कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या 99 नमुन्यांपैकी तीन नमुने फेल आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता आहे. बोगस कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यावर कारवाई करा आणि नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पिकावर वाढलेला अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी केली. मात्र, बोगस कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची खरेदी करताना सावध होणे गरजेचे आहे. या बोगस कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊन उत्पादनातही घट होऊ शकते.ऑगस्ट 2022 च्या अखेरपर्यंत कृषी विभाग व जि. प. कृषी विभागामार्फत 99 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यामध्ये तीन अहवाल फेल आढळल्याची माहिती आहे. सद्य:स्थितीत अळीचा प्रादुर्भाव व रोगराई थांबविण्यासाठी शेतकरी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करत आहे. त्यामुळे बोगस कीटकनाशक शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात 453 विक्री केंद्र सध्या ग्रामीण भागात फवारणीला वेग आला आहे. कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी तब्बल जिल्हाभर 453 विक्री केंद्रे आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्री केंद्रातून कीटकनाशकांची खरेदी करावी असा सूचनाही देण्यात आल्यात. शेतकऱ्यांनी अधिकृत कृषीसेवा केंद्रावरून औषधांची खरेदी करावी, औषधाच्या बिलावर तारीख, बॅच नंबर, प्लॉट नंबर पाहावा, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जाभरूनकर यांनी दिली. Akola : वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; फळबागा जमीनदोस्त, पिकांचेही अतोनात नुकसान पाहा VIDEO चार वेळा फवारणी पिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. यासाठी कीटकनाशकांची चार वेळा फवारणी केली मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. पिकांवरील कीड आणखी वाढत आहे. बोगस कीटकनाशक विकणाऱ्या कंपन्यावर त्वरित बंदी घाला आणि नुकसान भरपाई द्या अशी मागणी असल्याचे शेतकरी गोपाल पोहरे यांनी सांगितले. 
First published:

Tags: Agriculture, Akola, Akola News, शेतकरी

पुढील बातम्या