अकोला, 29 जून : भारतीयांचे सर्वात लोकप्रिय पेय कोणत? असं विचाराल तर आपसूकच चहाच नाव समोर येईल. भारतात अनेक चहाप्रेमी (Tea lover) सहज मिळतील. 'चहाला वेळ नसली तरी चालेल पण वेळेला मात्र चहा हवाच', असंच काहीसं चहाप्रेमींचं असतं (Tea addiction). दिवसाची सुरुवात चहापासून केली जाते. त्यानंतर दिवसभरात अनेक वेळा चहा पिणारे लोक सापडतील. चहावरील प्रेम पाहता चहाच्या व्हरायटी आणि बनवण्याची पद्दतीदेखील नवनवीन येत आहेत. अकोल्यात देखील तुम्हाला एक-दोन नाही तर चक्क 18 प्रकारचा चहा एका हाॅटेलमध्ये मिळतो. नक्की कसा आहे चहा, पाहूया या विशेष रिपोर्टमधून.
अकोला शहरात चहाची अनेक दुकाने आहेत. याठिकाणी गुळाचा चहा, ब्लॅक टी, लेमन टी, साधा चहा तुम्हाला ठिकठिकाणी मिळतो. मात्र सध्या अकोला शहरात नवीनच स्थापन झालेला वाफेवरचा चहा चर्चेचा विषय बनला आहे. अकोल्यातील अर्बन बॅंक समोरील सिव्हिल चौकात हा विशिष्ट पद्दतीचा वाफेवरचा चहा मिळतो. या वाफेवरच्या चहाची चव लय भारी आहे. या चहाच्या व्हरायटी देखील अधिक आहेत. एक दोन नव्हे तर चक्क 18 प्रकारचा चहा इथ बनतो. चहा पिण्यासाठी नागरिकांची, कॉलेजच्या मुलांमुलींची गर्दी पाहायला मिळते. चहाप्रेमी आपल्या आवडीनुसार चहाचा आस्वाद घेतात. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा चहा पिऊन संतुष्ट होतो.
आरोग्य विभागात 33 वर्ष सेवा दिल्यानंतर घरी बसण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने वाफेवरच्या चहाची संकल्पना सूचली. वाफेवरचा चहा हा विदर्भातील पहिलाच प्रयोग आहे. अकोलेकर देखील या चहाला चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती हाॅटेलचे मालक प्रकाश जाधव यांनी दिली.
“वाफेवरच्या चहाने ऍसिडिटी होत नाही”
वाफेवरचा चहा बनवणारे अनिकेत वाघोडे सांगतात की, आपण घरी चहा पितो तर आपल्याला ऍसिडिटी होते. मात्र, हा चहा पिल्याने ऍसिडिटी होत नाही. कारण हा चहा आम्ही वाफेवर बनवतो. आमच्याकडील चहाने कुठलाही साईड इफेक्ट सुद्धा होतं नाही. हा चहा फक्त 15 सेंकदात तयार होतो. आमच्याकडे वाफेवरचा चहा पिण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते.
“इथल्या चहाची चवच लय भारी”
चहा प्यायची इच्छा होते तेव्हा आम्ही इथ चहा पिण्यासाठी येतो. इथल्या चहाची चवच लय भारी आहे. अनेक प्रकारचा चहा इथ मिळत असल्याने आमच्या आवडीप्रमाणे चहा घेतो. वाफेवरचा चहा अशी पहिलीच संकल्पना आम्ही पाहिली असून या चहाची चव देखील अप्रतिम असल्याचे, चहाप्रेमींनी सांगितले.
हे वाचा - बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का?
वाफेवरचा चहा पिण्यासाठी हाॅटेलचा पत्ता
वाफेवरचा चहा दु. 2 रामायण हॉटेल, अकोला अर्बन बँक समोर, सिव्हिल लाईन ते जवाहर नगर रोड, अकोला.मो : 9422162660 / 9423129087
गुगल मॅपवरुन साभार
18 प्रकारच्या चहाची यादी आणि किंमती
1)मसाला टी - 15 रुपये, 2) इलायची टी -15 रुपये, 3) जंजीर टी -15 रुपये, 4) गवती टी -15 रुपये, 5) रोज टी -15 रुपये, 6) व्हॅनिला टी- 15 रुपये, 7) हनी टी-15 रुपये, 8) स्ट्रॉबेरी टी- 15 रुपये, 9) तुलसी -15 रुपये, 10) चॉकलेट टी- 15 रुपये, 11) केसर टी- 20 रुपये, 12) विदाउट शुगर- 15 रुपये,13) मसाला ब्लॅक टी- 15 रुपये, 14) इलायची ब्लॅक टी- 15 रुपये, 15) गवती चहा ब्लॅक टी- 15 रुपये, 16) लेमन मिंट टी- 15 रुपये, 17) ग्रीन ब्लॅक टी- 15 रुपये, 18) लेमन ब्लॅक टी-15 रुपये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Tea, Tea drinker