बीड, 8 जून : राज्यात दहावी आणि बारावीचे निकाल लागणार आहे, त्यामुळे वाढती स्पर्धा लक्षात घेऊन विद्यार्थ्यी आणि त्यांचे पालक जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) प्रवेश घेताना दिसतील, त्यामुळे बीड जिल्ह्यातील ITI मध्ये दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यानंतर विविध प्रकारचे ITI Course उपलब्ध आहेत, त्यामध्ये एकूण 20 ट्रेड उपलब्ध आहेत, त्यामुळे संस्थेच्या प्रशासनाकडून प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1 आणि 2 वर्षांच्या कोर्समध्ये कोणकोणते ट्रेड आहेत? बीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमांमध्ये 20 ट्रेड उपलब्ध आहेत. यामधील 12 ट्रेड हे 2 वर्षांच्या कालावधीचे आहेत, तर 8 ट्रेड 1 वर्षाच्या कालावधीचे आहेत. 1 वर्षाचे जे ट्रेड आहेत, त्यामध्ये प्लंबर, मेसन (बिल्डिंग कंट्रक्शन). पंप ऑपरेटर (कम मॅकेनिकल), कारपेंटर. डीटीपीओ, डिझेल मेकॅनिल, वेल्डर. कोपा, असे 8 ट्रेड निवडून विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. जे २ वर्षांचे ट्रेड आहेत, त्यामध्ये पेंटर जनरल, फिटर, टर्नर, मोटार मेकॅनिक, एमएमटीएम, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, वायरमन, वीजतंत्री, टूल डाय मेकर, असे ट्रेड विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. कोर्स पूर्ण झाल्यानंतर जाॅबच्या संधी कुठे असतील? व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर महावितरण, एसटी वर्कशॉप, नगरपालिका, रेल्वे, जिल्हा परिषद मासगाव, या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाॅबच्या संधी मिळतील. अनेक विभागांमध्ये आणि निमशासकीय कंपन्यांमध्येही जॉबची संधी उपलब्ध असतात. कोणत्या कंपनीच्या प्लेसमेंट असतात? यामध्ये औरंगाबादमधील संजीव ऑटो लिमिटेड, बजाज लिमिटेड, स्कोडा लिमिटेड, पनवेलमधील एलएमटी कन्ट्रक्शन, सोलर पॅनल निर्माण करणाऱ्या कंपनी, तसेच पुण्यातील चाकणमधील महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या प्लेसमेंट होतात. किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार? बीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मागील वर्षी 91 % अधिक प्रवेश झाले होते, यामध्ये 1 वर्षाच्या असणाऱ्या ट्रेडमध्ये 360 जागांपैकी 304 जागांवर प्रवेश झाले आहेत. 2 वर्षांच्या ट्रेडमध्ये एकूण 352 जागा पैकी 342 जागांवर प्रवेश झाले आहेत. यामध्ये मुलांबरोबर मुलींचे ही प्रमाण जास्त आहे. वाचा :
MH BOARD 12TH RESULT: अवघ्या काही क्षणात शिक्षण विभागाची पत्रकार परिषद; काय असतील महत्त्वाच्या गोष्टी?
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अतुल केसकर म्हणाले की, “या क्षेत्रामध्ये कुशल कामगार तयार होतो. त्यास ताबडतोब नोकरी मिळते. कमीत कमी कालावधीमध्ये स्वयंरोजगार उपलब्ध होऊ शकतो. मागील दोन महिन्यांमध्ये 70 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंटद्वारे रोजगार मिळाल्या आहेत.
गुगल मॅपवरून साभार…
…अशी असेल प्रवेश प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. दहावीचे आणि बारावीचे निकाल हाती आल्यानंतर काही दिवसातच प्रवेश प्रक्रिया ही सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला https://www.dvet.gov.in/mr/ या संकेत स्थळावर जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल. याचा संपूर्ण पत्ता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर रोड, बीड, असा आहे. संपर्क करण्यासाठी 0244 2 222448 या क्रमांकावर संपर्क साधून चौकशी करू शकतो.