मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Osmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्यादेखत कोवळी पिके फस्त

Osmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्यादेखत कोवळी पिके फस्त

सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण

सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण

मागील आठवड्यात जिल्ह्यात पावसाने धुमाकुळ घातला असून यात पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच गोगलगायी देखील पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

  उस्मानाबाद, 19 जुलै : लांबलेल्या पावसाने यंदा खरिपाच्या पेरणीसाठी (Kharif Sowing) उशीर झाला. जुलैमध्ये पावसाने हजेरी लावली. दमदार पावसामुळे पिकं जोमात आली. मात्र, पिकांवर नवीनच संकट ओढवले असून शंखी गोगलगायींनी (Snail on soybean) उभ्या पिकांवर हल्ला चढवला आहे. गोगलगायी रात्रीतून कोवळी पिके फस्त करीत आहेत. यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन (Soybean Crop) उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने यंदा बहुतांश शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या पेरणीकडे ओढ दिली. मात्र, मागील आठवड्यात जिल्ह्यात पावसाने धुमाकुळ घातला असून यात पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच गोगलगायी देखील पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शंकी गोगलगाय सोयाबीन पिक उध्वस्त करत आहे. तालुक्यातील किलज तसेच परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी पैशाची मोठी तडजोड करून पेरणीसाठी बी बियाणे खरेदी केली होती. मात्र, उभं पिकं डोळ्यादेखत नष्ट होत आहे आणि यावर कुठल्याही कीडनाशकांचा परिणाम होत नसल्याने तुळजापूर तालुक्यासह परिसरातील शेतकरी हे त्रस्त आहेत. गोगलगाय कसे नुकसान करते गोगलगायी सूर्यास्त झाल्यावर किडीवर आक्रमण करतात व सूर्य उगवण्यापूर्वी परत निघतात. दिवसा त्या पिकावर नसतात त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करताच येत नाही. गोगलगायीचे कवच टणक असल्याने त्यावर कोणत्याही औषधांचा परिणाम होत नाही. तसेच गोगलगायी एकावेळेस दीड ते दोन हजार अंडी घालतात. त्यामुळे त्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. या गोगलगायी शेतकऱ्यांची वावरेच्या वावरे चक्क उद्ध्वस्त करत आहेत. कृषी विभागामार्फत गावागावात शेतकऱ्यांना याबाबतीत मार्गदर्शन करण्याची सध्या जास्त गरज आहे. वाचा- Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO
   पेरणीसाठी उसनवारी करून पैशांची जुळवाजुळव
  शेतातील सोयाबीन पेरणी करण्यासाठी बी-बियाणे करिता पैशाची मोठी सांगड घातली. उसनवारी करून पैशांची जुळवाजुळव केली. पेरणीवेळी पाहिजे तेवढी ओल नसल्याने रान ओलावून पेरणी केली. आता कुठे पेरलेले सोयाबीन डोके वर करत असताना, कोवळे पिकं गोगलगायी फस्त करत आहे. यात आमचे मोठे नुकसान होत असून आम्हाला शासनाने नुकसान भरपाई द्यावी. तसेच गोगलगायी प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी तुळजापूर येथील शेतकरी निवृत्ती भोईटे यांनी केली आहे. “गोगलगायी मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात.”  शेतकऱ्यांनी शेतातील बांध स्वच्छ ठेवावेत. त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात. किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील, अशी माहिती कृषी अधिकारी संतोष रंदवे यांनी दिली आहे. 
  First published:

  Tags: Farmer, Osmanabad, शेतकरी

  पुढील बातम्या