मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Akola : शाळेची घंटा तर वाजली, पण शालेय साहित्याच्या किमतीत 10 ते 20 टक्क्यांनी वाढ

Akola : शाळेची घंटा तर वाजली, पण शालेय साहित्याच्या किमतीत 10 ते 20 टक्क्यांनी वाढ

X
फाईल

फाईल फोटो

उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या सावटामुळं शाळांचा घंटा आणि विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत नव्हता. कोरोनाचे घटते प्रमाण आणि लसीकरणामुळं अकोल्यातही काही शाळा सुरू झाल्या आहेत.

  अकोला 16 जून : कोरोनाच्या (Corona) संसर्गामुळं मागील दोन वर्ष ऑनलाइन शिक्षण (Online education) सुरू होतं. त्यावेळी दरवर्षीप्रमाणं शालेय साहित्याची विक्री झाली नाही. मात्र, यावर्षी शाळेची घंटा वाजली असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे. शालेय साहित्याने बाजारपेठ सजली असून, पालकही साहित्य खरेदीसाठी दिसून येत आहेत. पण, यंदा शैक्षणिक साहित्य महागलं (Increase in school materials prices) असून त्यामध्ये 10-20 टक्क्यांनी दरवाढ झाल्याची पहायला मिळत आहे.  वाढत्या महागाईमुळं त्रस्त झालेल्या पालकांच्या खिशाला शालेय साहित्य दरवाढीनं कात्री लागत आहे.

  वाचा- Akola Special Report : हवामान विभागाचा अंदाज चुकला, त्यात आमचा काय दोष? शेतकरी हवालदिल!

  उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या सावटामुळं शाळांचा घंटा आणि विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत नव्हता. कोरोनाचे घटते प्रमाण आणि लसीकरणामुळं अकोल्यातही काही शाळा सुरू झाल्या आहेत. बच्चे कंपनी खूप दिवसांनी शाळेत जायला मिळाल्यामुळं खूश आहेत. नवं दप्तर, नवीन कपडे, नवी पुस्तके आणि वह्या, अशा सगळ्या शालेय वातावरणात मुले शाळेत जाताना दिसत आहे.

  अकोला शहरात सध्या काही शाळा  सूरू झाल्या आहेत. मात्र, यंदा शैक्षणिक साहित्य महागले असून यात पेन, पेन्सिल, कंपासपेटी, दप्तर, पाटी, पुस्तक, गणवेश अशा साहित्याचा समावेश आहे. या माहागाईचा फटका फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. शाळेसाठी लागणारे गणवेशाचे भाव हे आधीपेक्षा 10 ते 20 पटीने वाढले आहेत.

  शहरातल्या दुर्गा चौकात चंपक कालानी (संपर्क क्रमांक 9422161732) यांचे परिवार कलेक्शन हे कपड्याचे दुकान असून या दुकानात विविध शाळांचे गणवेश मिळतात. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे दुकान उघडे राहते. महागाईबद्दल बोलतांना चंपक कलानी सांगतात की, आता सर्वच गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत, त्यात कपड्यांचेही भाव वाढले आहेत. कपडे शिवण्यासाठी लागणारी शिलाई, कपडा, मजुरी यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यातच सध्या गणवेशाचा स्टाॅक कमी असल्याचं व्यापारी सांगत आहेत, पैसे देऊनही आता वेळेत कपडे मिळत नाहीत. परिणामी गणवेशाचे दर वाढले आहेत.

  गुगल मॅपवरुन साभार

  वाचा- बीडच्या मुलांनो इकडे लक्ष द्या! इथल्या ITI मध्ये 1-2 वर्षांचा कोर्स संपताच, लगेच लागतो जाॅब, वाचा SPECIAL REPORT

  महागाईमुळं आता घर कस चालवाव याची काळजी लागली आहे. त्यात मुलांना लागणाऱ्या शाळेच्या गणवेशांच्या किंमतीही वाढल्या आहेत. हालाकीच्या परस्थितीत आम्ही काय करायच? यावर सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. सामान्य माणसांना झळा पोहोचत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

  First published:
  top videos

   Tags: Akola News, School, School student