अकोला, 21 जुलै : पावसाळा (Monsoon) म्हटलं की, गरमा गरम कुरकुरीत असं काहीतरी खाण्याची इच्छा तर होतेच. अशावेळी कांद्याची भजी, बटाट्याची भजी, पालक भजी कुठे मिळतात, याची शोधाशोध होते. मात्र, कुरकुरती पालक भजी खाण्यासाठी अकोल्यात एकमेव राधास्वामी हॉटेल आहे. (Radhaswami sweets and namkeen) इथं अगदी स्वादिष्ट पालक भजी (palak bhaji and chutney) आणि त्यासह हिरवी चटणी मिळते. अकोला शहरातील रामदासपेठ येथे राधास्वामी स्वीट्स आणि नमकीन हॉटेल आहे. पालक भजी आणि चटणी यासाठी हे हाॅटेल फेमस असून परिसरातील खवय्ये याठिकाणी खाण्यासाठी आवर्जून येतात. गेल्या 43 वर्षापासून साधास्वामी हॉटेलात स्वादिष्ट पालक भजी चटणी मिळते. शहरातील नागरिक उत्तम चविष्ट नाष्टा करायचा असेल तर याच हॉटेलात येतात. शहरातील पालक भजी आणि चटणी मिळणारे हे एकमेव ठिकाण आहे.
गुगल मॅपवरून साभार हेही वाचा-
Osmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्यादेखत कोवळी पिके फस्त
राधास्वामी हॉटेल गेल्या 43 वर्षांपासून लोकांच्या सेवेत आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत इथं नाष्टा मिळतो. 1978 मध्ये हे हॉटेल आमच्या वडिलांनी सुरू केलं होतं. वडिलानंतर हॉटेलचे कामकाज मी पाहतो. आमच्या हॉटेलात पालक भजी आणि त्यासोबत चटणी दिली जाते. यासह मुंगवडा, मिरची भजे, पालक भजे, ब्रेड पकोडा, आलू वडा, स्वीट्स, नमकीन, ब्रेड पकोडा देखील इथं मिळतो. मात्र, लोकं येथील पालक भजी आणि चटणी आवडीने खात असल्याचे मालक हरीश जसवानी यांनी सांगितले. हरीश यांच्यासह त्यांचा मुलगा रमेश जसवानी देखील हॉटेलाचे कामकाज पाहत असून जसवानी यांची ही तिसरी पिढी आहे. हॉटेलसाठी संपर्क क्रमांक 9923264477/9049433555. डाबकी रोड इथून नाष्टा करण्यासाठी मी इथे आलो आहे. इथली चव नेहमीच अप्रतिम असते, असं ग्राहक लक्ष्मीकांत माडीवाले सांगतात. तर गेल्या 25 वर्षापासून मी या ठिकाणी नाष्टा करत असून, येथील पालक भजी आणि चटणी चविष्ट आहे. अशी पालक भजी जिल्ह्यात कुठेही मिळत नसल्याचे ग्राहक मनोज बागडे सांगतात. हेही वाचा-
Beed : दिल्लीच्या कार्यक्रमात सादर होणार अस्सल लावणी; बीडची ‘ही’ तरुणी करणार सादरीकरण, VIDEO
हॉटेलात पालक भजी 36 रुपये प्लेट मिळते. किलोप्रमाणे देखील येथील भज्याची विक्री होत असून 80 रुपये पाव आणि 320 रुपये किलो याचा दर आहे. हॉटेलात देखील तुम्ही नाष्टा खाऊ शकता आणि पार्सलची देखील सुविधा उपलब्ध आहे. हॉटेलची वेळ सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारापर्यंत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.