मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Akola : पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, पाहा Video

Akola : पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, पाहा Video

चिमुकले विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून नदीतील वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून शाळा गाठत आहेत. अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख गावातील हा प्रकार आहे.

अकोला, 17 सप्टेंबर : घर आणि शाळेच्यामध्ये नदी असल्याने चिमुकले विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून नदीतील वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून शाळा गाठत आहेत. अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख गावातील हा प्रकार आहे. पावसाळ्यात नदीवर पूर येतो. बोर्डी नदीवर पूल नसल्याने चिमुकल्यांना शिक्षणासाठी नदी पार करण्याची कसरत करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. अनेक छोट्यामोठ्या नदी नाल्यांना पूर आला आहे. पुराचा त्रास ग्रामीण भागातील नागरिकांना होत आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अकोट तालुक्यामधील वडाळी देशमुख हे गाव राजकीय दृष्ट्या चर्चित आहे. मात्र, विकासाच्या दृष्टीने जैसे थेच आहे. दैनंदिन साहित्यासाठी देखील नदी पार करण्याची वेळ वडाळी देशमुख येथील छत्रपती शिवाजीनगर बोर्डी नदीच्या तीरावर वसलेले असून नदीला पूर आला की संपूर्ण मजूर वर्गाचा संपर्क गावापासून तुटतो. गेल्या कित्येक वर्षापासून या वस्तीमधील नागरिकांची कुठल्याच प्रकारची सुविधा उपलब्ध नाहीत. दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी नागरिकांना नदी पार करावी लागते. हेही वाचा-  पारंपारिक शेतीला फाटा देत अख्खं गाव करतयं केळीची शेती, पाहा VIDEO जीव धोक्यात घालून नदीपात्रातून प्रवास चिमुकल्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करावा लागतो. शिवाजीनगरातील विद्यार्थ्यांना बोर्डी येथील शाळेत जाण्यासाठी नदी पार करावी लागते. पर्यायी रस्ता किंवा पूल नसल्याने नदीच्या गुडघ्याभर पाण्यातून पालकांना मुलांना कडेवर घेऊन नदी पार करावी लागते. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. प्रशासनाने लक्ष द्यावे  शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण पुरामुळे खडतर होत आहे. अधिक पावसात बोर्डी नदी पार करणे अशक्य होते त्यामुळे विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येते. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर बोर्डी नदीवर पूल बांधावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
First published:

Tags: Akola, Akola News, Rain, Rain flood

पुढील बातम्या