Home /News /maharashtra /

Akola : पुस्तकांचा ‘चिवचिव बाजार’ माहितीये का?; इथं मिळतात अगदी अल्प दरात पुस्तके, पाहा VIDEO

Akola : पुस्तकांचा ‘चिवचिव बाजार’ माहितीये का?; इथं मिळतात अगदी अल्प दरात पुस्तके, पाहा VIDEO

title=

शाळा सुरू झाल्या आहेत. महाविद्यालये देखील काही सुरू झाली आहेत काहींची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. शाळा महाविद्यालये म्हटलं की अभ्यास आला आणि अभ्यास म्हणलं की पुस्तके आलीच. मग ही पुस्तके खरेदी करावी लागतात. वाढती माहगाई आणि वृक्ष तोडीमुळे पुस्तकांच्या किमती देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. अशात कुठं काही डिस्काऊंट मिळत असेल तर तिथं जाऊन आपण पुस्तके खरेदी करतो.

पुढे वाचा ...
    अकोला, 5 जुलै : वाचनप्रेमी (Reader) कुठेही नव्या ठिकाणी गेले की त्या भागातील पुस्तकाची दुकाने (Book stores) शोधून काढतात. आपल्या आवडीचे अभ्यासाचे पुस्तके विकत घेतात. पण सध्या पुस्तकाच्या किमती देखील प्रचंड वाढल्या आहेत. वाढल्या किमतीमुळे पुस्तक खरेदी करण्याचा आनंद मिळत नाही. पण हा आनंद मिळवून देणारे ठिकाण मिळालं तर? आज आम्ही असेच एक ठिकाण सांगणार आहोत, जिथं सर्व प्रकारची पुस्तके अगदी अल्प दरात मिळतात. अकोल्यात चिव चिव बाजार (Chiv Chiv Bazar Akola) म्हणून हे ठिकाण प्रचलित आहे. शाळा सुरू झाल्या आहेत. महाविद्यालये देखील काही सुरू झाली आहेत काहींची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. शाळा महाविद्यालये म्हटलं की अभ्यास आला आणि अभ्यास म्हणलं की पुस्तके आलीच. मग ही पुस्तके खरेदी करावी लागतात. वाढती माहगाई आणि वृक्ष तोडीमुळे पुस्तकांच्या किमती देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. अशात कुठं काही डिस्काऊंट मिळत असेल तर तिथं जाऊन आपण पुस्तके खरेदी करतो. मात्र, अकोल्यात एक बाजार आहे जिथं अगदी अल्प दरात पुस्तके मिळतात. चिवचिव बाजार म्हणून या बाजाराची ओळख आहे. Beed : लाखो लोकांना शुद्ध पाणी पुरवणारी ‘जलशुद्धीकरण’ प्रक्रिया पाहिलीये का?, पाहा VIDEO जुन्या पुस्तकांची खरेदी विक्री अकोला शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या चिवचिव बाजारात अगदी अल्पदरात पुस्तके आणि वह्या मिळतात. सध्या शाळा महाविद्यालये सुरू झाल्या असल्याने या बाजारात पुस्तके खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 70 वर्षांपूर्वी हा बाजार सुरू करण्यात आला होता. पूर्वी हा बाजार शहरातील गांधी रोडवर होता. आता शासनाने हा बाजार शहरातील मध्यवर्ती भागातील मुंगीलाल बाजोरिया शाळेच्या समोरील जागेवर स्थापित केला आहे. चिवचिव बाजारामध्ये जुनी पुस्तके विकत घेतली जातात आणि त्या पुस्तकांना बाईडिंग करुन ती पुस्तके अल्प दरामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिली जातात. Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO चिवचिव बाजार पत्ता तुम्हाला जर अल्पदरात पुस्तक आणि वह्या हव्या असतील तर अकोला शहरातील चिवचिव बाजारात नक्की भेट द्या. बाजाराचा पत्ता- राधाकिसन प्लॉट, बि. आर. हायस्कूलच्या बाजूला चिव चिव बाजार असा आहे. Chiv Chiv Bazar गुगल मॅपवरून साभार … म्हणून चिवचिव बाजार नाव पडले पुस्तके खरेदीसाठी इथं नेहमीच गर्दी असते. त्यामुळे येथील मार्केटला चिवचिव बाजार असे नाव पडले आहे. शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील येथील बाजारातून पुस्तकांची खरेदी करतात. या ठिकाणी सर्वच विभागाची पुस्तके उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी गर्दी दिसून येते.  अल्पदरात पुस्तकांची विक्री करुन समाजसेवा चिवचिव बाजारात हरणे बुक डेपो नावाने आमचं दुकान आहे. येथील बाजारात एकूण 18 ते 20 दुकान आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही हे दुकान चालवतो. दुकानात सर्व प्रकारची पुस्तके लेटर बुक मिळतात. गेल्या 50 वर्षापासून आम्ही अल्पदरात पुस्तकांची विक्री करुन समाजसेवा करत आहोत. इतर ठिकाणी एक लेटर बुक 52 रुपयाला मिळत असेल तर आम्ही ते 40 रुपयाला विकतो. त्याचबरोबर जुन्या पुस्तकांचीही खरेदी विक्री इथं होते. या बाजारामध्ये आमच्या ही तिसऱ्या पिढी काम करत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर दोन ते तीन महिने बाजारात मोठी गर्दी असल्याचे हरणे बुक डेपोचे मालक सुधाकर हरणे यांनी सांगितले.
    First published:

    Tags: Akola News

    पुढील बातम्या