मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Akola : पुढच्या वर्षी लवकर या…! भावुक वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप, पाहा VIDEO

Akola : पुढच्या वर्षी लवकर या…! भावुक वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप, पाहा VIDEO

X
बाप्पाची

बाप्पाची भक्तिभावाने सेवा केल्यानंतर जड अंत:करणाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. 'पुढच्या वर्षी लवकर या' हे सांगायला मात्र, भक्तांचा ऊर दाटून आल्याचे दिसले.

बाप्पाची भक्तिभावाने सेवा केल्यानंतर जड अंत:करणाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. 'पुढच्या वर्षी लवकर या' हे सांगायला मात्र, भक्तांचा ऊर दाटून आल्याचे दिसले.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Akola, India

  अकोला : आज अनंत चतुर्दशी असून (Anant Chaturdashi) दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन (Ganpati Visarjan) केले जात आहे. बाप्पाची भक्तिभावाने सेवा केल्यानंतर जड अंत:करणाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. 'पुढच्या वर्षी लवकर या' हे सांगायला मात्र, भक्तांचा ऊर दाटून आल्याचे दिसले. कुठे ढोल ताशांचा निनाद, तर कुठे दिंडीचा दणदणाटात गुलालाची उधळण करत गणरायाला वाजत गाजत निरोप दिला जात आहे.

  भक्तीत तल्लीन झालेल्या भक्तांना बघता बघता 10 दिवस कसे निघून गेले कळालेच नाही. गणरायाला निरोप देताना, निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा, माफी असावी अशाच भावना भक्तांचा होत्या. अकोला शहरात सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे, सजावट केली होती. पर्यावरणासह बेटी बचाव, बेटी पढाव, स्वच्छता आदी संदेश देऊन जनजागृतीचा प्रयत्न केला होता. गणेश विसर्जनासाठी मनपाने शहर कोतवाली समोर मुख्य गणेश घाट, हरिहरपेठ गणेश घाट, निमवाडी गणेश घाट, हिंगणा गणेश घाट इथे विसर्जनाची तसेच निर्माल्य टाकण्याची वेगळी व्यवस्था केली होती. मुख्य गणेश घाटावर अनेक कृत्रिम तलाव तयार केले होते. या तलावात विसर्जन केलेल्या गणपतीचे नंतर कापशी तलाव आणि बाळापुरच्या नदीत विसर्जन करण्यात येणार आहे.

  मानाचा  बाराभाई गणपती

  कोरोनामुळे दोन वर्षापासून बंद असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी सकाळी 10 वाजता पासून राजेश्वर मंदिर येथून सुरुवात झाली. पहिला मानाचा गणपती म्हणून बाराभाईचा गणपती ओळखला जातो. अकोल्याचा धार्मिक इतिहास चाळताना प्रामुख्याने राजराजेश्वर आणि बाराभाई गणपती ही नावे समोर येतात. गणेशोत्सव निमित्त बाराभाई गणपतीची उत्सवाची परंपरा गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत हा गणपती मानाचा म्हणून प्रथम क्रमांकावर असतो.

  हेही वाचा- यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO

  पोलिसांनी तगडा बंदोबस्त

  गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग सीसीटीव्ही कॅमेरा व ड्रोन कॅमेऱ्याच्या निगरानीखाली ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलवण्यात आली आहे. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला हजारो गणेशभक्तांनी निरोप दिला. आज सकाळपासून वाजत- गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, ढोल-ताशांच्या तालावर गणेशभक्त थिरकताना दिसून आले. दरवर्षी बाप्पा येतो. या दहा दिवसाच्या उत्सवाच्या काळात गणरायाची सेवा, आरास केली जाते. शहरात ठिकठिकाणी कृत्रिम तलाव करण्यात आले असून शहरातील नागरिक येथे गणपतीचे विसर्जन करीत आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Akola, Akola News