अकोला, जुलै 19 : जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला (heavy rainfall) आहे. पावसाच्या पाण्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. अकोला शहरातील मनपा क्षेत्रात नव्याने हद्दवाढ झालेल्या गुडधीतील अनेक घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले आहे. अनेक घरातील कपडे धान्यासह वस्तूंचे मोठे नुकसान झालं आहे. गेल्या वर्षीपासून येथील नागरिकांच्या घरात पाणी घुसत असून मोठे नुकसान होत आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. (Akola rain update) अकोला शहरातील गुडढी भागात नाल्याचे पाणी अनेकांच्या घरात घुसले आहे. ज्यांची मातीची घरे आहेत, त्यांचे मोठं नुकसान झालं. पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाल आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली होती. घरात शिरलेल्या पाण्याने घरातील धान्य, कपडे, खाण्याच्या वस्तू वाहून गेल्या. घरात पाणी आल्याने अनेकांच्या घरात चुलही पेटलेली नाही. घरात बसायला जागा देखील उरली नाही अशी अवस्था झाली आहे. वाचा- Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने आमच्या घरात पाणी शिरले आहे, घरातील धान्य, कपडे, इतर वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे. घरात पाणी आल्याने घरातील चूल देखील पेटवता आली नाही. पोटाला जेवण सुद्धा मिळालेले नाही. दुसऱ्याच्या घरून जेवण चहापाणी आम्हाला पुरवलं गेलं. मागच्या वर्षीपासून आमच्या घरात पाणी घुसत आहे. प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. आमची दखल कोणीही घेत नाही. आमच्या समस्येबाबत अनेक वेळा प्रशासनालाही पत्र देण्यात आलं, मात्र आमच्या गरिबांचं कोणी ऐकत नाही, असे येथील नागरिक सांगतात. जिल्हा प्रशासनाकडून महानगरपालिकेला सूचना देण्यात आलेल्या आहेत. गुडधी परिसरात पुन्हा पाणी येणार नाही. येथे येणारे पाणी दुसरीकडे वळवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी महानगरपालिकेला दिलेल्या आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.