मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Akola : ह्रदयद्रावक! तंबाखूची डबी आणि चप्पलामुळे झाला घात, आजोबा आणि नातू गेले पुराच्या पाण्यातून वाहून

Akola : ह्रदयद्रावक! तंबाखूची डबी आणि चप्पलामुळे झाला घात, आजोबा आणि नातू गेले पुराच्या पाण्यातून वाहून

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Akola) आजोबा आणि नातवाचा नदीच्या पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Akola) आजोबा आणि नातवाचा नदीच्या पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Akola) आजोबा आणि नातवाचा नदीच्या पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Sandeep Shirguppe

अकोला, 14 सप्टेंबर : मागच्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. दरम्यान काही भागातील मार्गही बंद आहेत परंतु काही नागरिक जिवाच्या करारावर या मार्गावरून जात आहेत. दरम्यान अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Akola) आजोबा आणि नातवाचा नदीच्या पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान नातवाला शाळेला जायचे होते म्हणून त्यांची गडबड चालू होती यातच ते दोघे वाहून गेले.

नदीच्या पुरात नातवाची चप्पल अन् आजोबांची तंबाखूची डबी पडली. दोन्ही वस्तू पुरातून काढण्यासाठी नातवाने धडपड सुरू केली; मात्र त्याचा पाय घरसल्याने तो पुरात वाहून जात असल्याचे दिसताच आजोबांनी नदीत उडी घेत नातवाला छातीशी घट्ट पकडलेही मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघेही पुरात वाहून गेले. 13 सप्टेंबरला सकाळी 08 वाजताच्या सुमारास अकोट तालुक्यातील मोहाडी नदीच्या पुलाजवळ ही घटना घडली. यामध्ये आजोबाचा मृत्यू झाला असून, नातवाचा नदीपात्रात बचाव पथकाकडून शोध सुरू होता.

हे ही वाचा : तेरा पीछा नहीं छोडूँगा; मान्सूसचा कहर कायम; पुढील 3-4 दिवस अख्ख्या राज्यभरात मुसळधार पाऊस

तांदूळवाडी येथील ६० वर्षीय शेतकरी प्रभाकर प्रल्हाद लावणे व त्यांचा ११ वर्षीय नातू आदित्य विनोद लावणे हे जवळच असलेल्या ग्राम सोनबर्डी येथे म्हैस घेऊन गेले होते. तेथून परतताना मोहाडी नदीच्या पुलावर आजोबांची तंबाखूची डबी पाण्यात पडली. तसेच नातवाची चप्पलही पाण्यात पडली. दोन्ही वस्तू पाण्यातून बाहेर काढताना नातवाचा पाय घसरून तो पाण्यात पडला.

नातू वाहत जात असल्याचे दिसताच आजोबांनी पुरात उडी घेऊन नातवाला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. नातवाला पकडण्यासाठी त्यांना यशसुद्धा आले; मात्र नियतीने साथ दिली नाही.

हे ही वाचा : पोहणे जीवावर बेतले, आठवीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

आदित्यला जायचे होते शाळेत

आदित्य लावणे हा इयत्ता पाचवीमध्ये तांदुळवाडी येथील जि. प. शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. आदित्यला सकाळी १० वाजता शाळेत जायचे होते. मात्र, नियतीने डाव साधला. तो आजोबासोबत गेल्याने पुरात वाहून गेला. त्याला दोन बहिणी असून, वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत.

First published:

Tags: Akola, Akola News, Rain flood

पुढील बातम्या