मुंबई, 13 सप्टेंबर : राज्यात मागच्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. सध्या कोकण, घाट परिसरात मान्सून सक्रिय आहे. यानंतर आता हवामान खात्याने राज्यातील पाऊस परिस्थिती संदर्भात आणखी एक इशारा दिला आहे. हवामान खात्याने नेमकं काय म्हटलं? पुढील 3, 4 दिवस आणि त्यापुढील दिवसात मान्सून राज्यात सक्रिय राहील आणि कृपया येथे सूचित केल्यानुसार विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा वाढता परिणाम होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
13 Sept: पुढील 3, 4 दिवस आणि त्यापुढील दिवसात मान्सून राज्यात सक्रिय राहील आणि कृपया येथे सूचित केल्यानुसार विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 13, 2022
कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा वाढता परिणाम होऊ शकतो
दररोज IMD अलर्ट पहा, pic.twitter.com/XRMyKcPyc6
दरम्यान, मुंबई आणि ठाणे परिसरात दुपारी 1.45 वाजतापर्यंत गेल्या 6 तासात पावसाच्या वारंवार तीव्र सरी दिसल्या आणि पुढील 2, 3 दिवस हा पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या या सक्रिय टप्प्यात काळजी घ्या आणि सतर्क रहा, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. तसेच तेरा पीछा नहीं छोड़ूँगा मैं, असं मुंबईकरांना कदाचित हा मान्सून सांगत असेल, असं हवामान खात्याचे तज्ञ के. एस. होसाळीकर म्हणाले आहेत.
13 sept, Mumbai Thane , NM rainfall in last 6 hrs at 1.45 pm.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 13, 2022
Frequent intense spells of rainfall observed and likely to continue for next 2,3 days.
Take care and be alert please in this active phase of monsoon.
May be Monsoon telling #Mumbaikars;
तेरा पीछा नहीं छोड़ूँगा मैं .. pic.twitter.com/EPt7Lbzc17
हेही वाचा - Konkan Rain Alert : कोकणात पावसाची जोरदार बॅटींग, भात शेतीचे मोठे नुकसान, गावांचा संपर्क तुटला मच्छिमारी व्यवसाय ठप्प - दरम्यान, समुद्रात ताशी 45 ते 60 किमी. वेगाने वारे वाहणार असण्याची शक्यता वर्तविली. यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जावू नये, असा संदेश आल्याने समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच मालवण व गुजरातमधील नौकांचा समावेश आहे. पाऊस व वारा हे वातावरण आणखी दोन ते तीन दिवस असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यानंतर वारंवार होणार्या वातावरणातील बदलामुळे मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होत आहे. सध्या निर्माण झालेल्या वातावरणामुळे मच्छिमारी व्यवसाय ठप्प झाला आहे.