मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Akola : खर्रा खाताना ठसका लागला अन् जागेवरच संपला काय झालं नेमकं वाचा

Akola : खर्रा खाताना ठसका लागला अन् जागेवरच संपला काय झालं नेमकं वाचा

तुलंगा खुर्द गावात धक्कादायक घटना घडली आहे..सुपारीचा खर्रा (घोटा) खाऊन ठसका लागल्याने मृत्यू झाल्याची घटना

तुलंगा खुर्द गावात धक्कादायक घटना घडली आहे..सुपारीचा खर्रा (घोटा) खाऊन ठसका लागल्याने मृत्यू झाल्याची घटना

तुलंगा खुर्द गावात धक्कादायक घटना घडली आहे..सुपारीचा खर्रा (घोटा) खाऊन ठसका लागल्याने मृत्यू झाल्याची घटना

अकोला, 22 सप्टेंबर : अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या तुलंगा खुर्द गावात धक्कादायक घटना घडली आहे. सचिन अविनाश आठवले (वय 36) यांचा सुपारीचा खर्रा (घोटा) खाऊन ठसका लागल्याने मृत्यू झाल्याची घटना काल 21 सप्टेंबरला घडली आहे. (Akola) याबाबत सगळ्यांनाच धक्का बसला आहे. गुटखा खाताना त्यांचा श्वास एकदम गुदमरला यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, युवकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनने सुपारीचा गुटखा (घोटा) खाल्ल्याने त्याला ठसका लागला. त्यामुळे त्याला श्वास घेणं कठीण झालं होतं. हा प्रकार बघून सचिनला तत्काळ ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेण्यात आलं. परंतु, येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सचिन यांचा मृतदेह बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असून, या प्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हे ही वाचा : दूध-दह्याचे पुन्हा दर वाढणार, ही कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

याबाबत पोलिसांना विचारले असता शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील माहिती देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत युवकाचा सुपारीचा खर्रा खाऊन ठसका लागल्याने मृत्यू झाल्याचे कळते आहे. असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, सचिन यांच्या पश्चात आई, बहिण, पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे, तर अकोल्यात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने केली आत्महत्या, औरंगाबाद हादरलं

औरंगाबाद शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल आग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. अनिल आग्रहारकर यांच्या आत्महत्येमुळे बांधकाम श्रेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल माधवराव आग्रहारकर (वय 55) यांनी उल्कानगरी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवण घेतल्यानंतर ते खोलीत झोपण्यासाठी गेले होते.

हे ही वाचा : वर्गमित्राचा त्रास असह्य झाला इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, नांदेडमधील घटना

सकाळी 8.30 वाजले तरी ते खोलीतून बाहेर आले नाही. त्यामुळे खोलीत डोकावून पाहिले असता आग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आग्रहारकर यांच्या आत्महत्येमुळे औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Akola, Akola News

पुढील बातम्या