अकोला, 27 ऑगस्ट : अकोला जिल्ह्यातील उगवा येथील दोन युवकांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान या दोन युवकांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. (akola crime) आत्महत्या केलेल्या आशिष गोपीचंद अडचुले (35) याचे दोन-तीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये त्याने अकोट फैल पोलिसांवर थेट आरोप केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी केस दाबण्यासाठी 1 लाख रुपयांसह हप्ते घेतल्याचा आरोप केला आहे.
यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी चौकशी समिती नेमली आहे. उगवा येथील सुभाष शेषराव भातकुले (36) यांच्यासह आशिष गोपीचंद अडचुले (35) या दोघांनी नापिकीला कंटाळून मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणात अकोट फैल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
हे ही वाचा : लग्नाचे अमिष दाखवून बलात्काराचा आरोप, भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांना सर्वात मोठा दिलासा
परंतु त्यातील आशिष अडचुले याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या व्हिडीओमुळे पोलीस अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणात अडचुले याच्या कुटुंबीयांनी अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार केलेली नाही. दरम्यान पोलिसांनी पैशासाठी हे केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर अकोला पोलिसांच्या या कृत्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याची चौकशी लावण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे यामध्ये काय निष्पण्ण होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
तेल्हारा (जि. अकोला) तालुक्यातील वारी हनुमान गावानजीक तलावावर मासेमारी करण्यासाठी गेलेल्या युवकाला तापलेल्या सळईचे चटके दिल्याची घटना समोर आली आहे. (Akola Crime) दरम्यार सळईने चटके दिलेल्या युवकाने वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आरोप केला आहे. धूळघाट रेल्वे (ता. धारणी) गावातील या जखमी युवकाने पोलिसात तक्रार दिली आहे. त्याने दिलेल्या जबाबावरून धारणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
अकोट तालुक्यातील दुसऱ्या घटनेचीही चर्चा
अंकुश गोरेलाल मावस्कर असे जखमी युवकाचे नाव आहे. अंकूशने पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाच्या सोनाळा वनक्षेत्रपाल कर्मचाऱ्यांनी वनविभागाच्या जागेत आल्याबद्दल त्याला आणि दोन मित्रांना अटक केली. आनंद रामेश्वर कासदेकर (25), पप्पू चव्हाण (30) यांच्यासोबत घरातून निघाला ते फिरत फिरत तर सायंकाळी सहा वाजता तलावावर पोहोचले. दोघे तलावाच्या काठावर बसले होते, तर अंकुश जाळे टाकण्याकरिता उतरला होता. एक मासोळी गळाला लागताच त्याने मित्रांना चूल मांडून कालवण करण्यास सांगितले.
हे ही वाचा : कुटुंबाला मृत्यूनं गाठल! ३०० फूट दरीत कार कोसळून मोठी दुर्घटना
अंकुश गोरेलाल मावस्कर असे जखमी युवकाचे नाव आहे. अंकूशने पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाच्या सोनाळा वनक्षेत्रपाल कर्मचाऱ्यांनी वनविभागाच्या जागेत आल्याबद्दल त्याला आणि दोन मित्रांना अटक केली. आनंद रामेश्वर कासदेकर (25), पप्पू चव्हाण (30) यांच्यासोबत घरातून निघाला ते फिरत फिरत तर सायंकाळी सहा वाजता तलावावर पोहोचले. दोघे तलावाच्या काठावर बसले होते, तर अंकुश जाळे टाकण्याकरिता उतरला होता. एक मासोळी गळाला लागताच त्याने मित्रांना चूल मांडून कालवण करण्यास सांगितले.
दरम्यान काही वेळाने सोनाळा वनक्षेत्रपलातील अधिकारी व वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मित्रांना अंकुशला आवाज देण्यास सांगितले, तो चुलीजवळ येताच पाच ते सात जणांनी त्याला पकडले व कोअर क्षेत्रात का आला, असे म्हणून त्याचे हात पाय पकडून गरम सळईचे चटके हातावर, पायावर, मांडीवर, पोटावर, त्याला तेथेच जखमी अवस्थेत सोडून निघून गेल्याचे तक्रारदार अंकुशने पोलिसांना माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News, Crime news, Suicide, Suicide news