अकोला, 24 ऑगस्ट : अकोल्यातील (Akola) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University) मुलींच्या वसतिगृहात (girls' hostel) एक मुलगा वेषांतर करून शिरला. (Akola Agriculture University) हा मुलगा वसतिगृहात जाताना व येताना त्याची कोणतीही चौकशी करण्यात आली नाही, व त्याला वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावरसुद्धा कोणी हटकलं नाही. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर कृषी विद्यापीठ प्रशासन (administration) खडबडून जागं झालं, व त्यांनी घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे (inquiry) आदेश दिलेत. ‘आजतक’ने याबाबत वृत्त दिलंय.
अकोला येथील कृषी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील काही मुलींनी त्यांच्याच कॉलेजमधील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत एक पैज (bet) लावली होती. या मुलींनी संबंधित विद्यार्थ्याला 'तू आमच्या वसतिगृहात येऊ शकत नाहीस' असं आव्हान दिलं होतं. हे आव्हान संबंधित विद्यार्थ्याने स्वीकारलं, व तो मुलीचे कपडे घालून आणि तोंडावर स्कार्फ बांधून मुलींच्या वसतिगृहात शिरला. एवढचं काय, तो तेथील मुलींसोबत बोलून वसतिगृहातून बाहेर पडला.
हे ही वाचा : Beed Student : धक्कादायक! एचआयव्ही बाधित विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलल्याचा आरोप, पालकमंत्र्याकडे तक्रार
विशेष म्हणजे, मुलींच्या वसतिगृहातून हा मुलगा बाहेर पडत असताना त्याची कोणीही चौकशी केली नाही. वसतिगृहात आत जाताना व तेथून बाहेर येताना त्याला कोणी हटकलंही नाही. मात्र, संबंधित विद्यार्थ्याच्या मित्रानेच या संपूर्ण घटनेचा मोबाईलमध्ये एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र कृषी विद्यापीठ प्रशासन खडबडून जागं झालं आहे.
व्हिडिओच्या माध्यमातून हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, संबंधित प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी या प्रकरणी दोषी असणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल, असंही कुलसचिव सुरेंद्र काळपांडे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना ही पैज लावणं चांगलंच महागात पडणार असून आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे सर्वच विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.
हे ही वाचा : विहिरीत पडलेल्या मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू, वाचा नेमकं काय घडलं
दरम्यान, दुसरीकडे या घटनेनंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेत निष्काळजी होत असल्याचं समोर आलं आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. ही घटना खूपच गंभीर असून अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, तसंच वसतिगृहात विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कृषी विद्यापीठ प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News, Student