मुंबई, 03 जुलै : विधानसभा अध्यक्ष (assembly election) पदासाठी आज निवडणूक पार पडली. भाजपकडून राहुल नार्वेकर (assembly chairman rahul narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महाविकास आघाडीकडून (mahavikas aghadi) राजन साळवी यांना मैदानात उतरवले होते. यामध्ये राहूल नार्वेकर यांना 164 मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला तर राजन साळवी यांना 107 मते मिळाली. एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आमदार आमने-सामने आले. दरम्यान उपाध्यक्षांच्या भाषणानंतर काही नेत्यांची भाषणे झाली यामध्ये सुधिर मुनगुंटीवार (sudhir mumguntivar) यांनी भाषणातून अजित पवारांना पुन्हा डिवचल्याने जोरदार चर्चा रंगली.
यावेळी मुनगुंटीवर म्हणाले कि, अजितदादा, तुम्ही म्हणालात की सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या कानात सांगितले असते तर तुम्ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली असती. ते आता शक्य नाही, त्यांची चूक झाली. पण मी तुम्हाला सांगतो की, तुम्हाला आयुष्यात असे जर कधी वाटले तर आमच्या कानात मात्र निश्चित सांगा. तुम्ही या अगोदर सांगितले होते पण तेव्हा (२३ नोव्हेंबर) ते जमले नाही. आणि जयंत पाटील यांच्या कानात कधीच सांगू नका. त्यांच्यात कानात सांगणे धोक्याचे आहे", अशी कोपरखळी मुनगंटीवार यांनी मारली.
हे ही वाचा : Assembly Speaker Election : फडणवीसांच्या कानात सांगितलेलं तसं झालं असतं तर आज...,आदित्य ठाकरे अखेर बोलले
"आता हे नवं सरकार कसं आलं काय आलं यात मी जात नाही. पण एकनाथराव तुम्ही मला जरी एकदा कानात सांगितलं असतं की उद्धव ठाकरेंशी बोला आणि अडीच वर्ष झालीत मला मुख्यमंत्री करा तर मी नक्कीच त्यांच्याशी बोललो असतो. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता", असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी विधानभवनात उपस्थित असेलल्या आदित्य ठाकरेंकडेही याची विचारणा केली. "काय आदित्य आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता ना?", असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वाक्याने सर्वत्र हशा पिकला.
हे ही वाचा : फडणवीस CM न झाल्याने गिरीश महाजन तर अजूनही फेट्याने डोळे पुसताय, अजितदादांची तुफान बॅटिंग
दरम्यान या भाषणानंतर अजित पवार, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस यांना आपल्या गालावरील हसू लपवता आले नाही. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत जोरदार सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर जोरदार उपरोधात्मक टीकाटिप्पणी झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election, Assembly session, BJP, Shiv Sena (Political Party), Sudhir mungantiwar