जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यात माझ्यामुळे जीवाला धोका असलेल्याला संरक्षण द्या - अजित पवार

पुण्यात माझ्यामुळे जीवाला धोका असलेल्याला संरक्षण द्या - अजित पवार

पुण्यात माझ्यामुळे जीवाला धोका असलेल्याला संरक्षण द्या - अजित पवार

अजित पवार यांच्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याच्या भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 12 एप्रिल : पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याने अजित पवार यांच्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार दिलीय. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, माझ्याविरोधात ज्याने तक्रार दिलीय त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. माझ्यामुळे कुणाच्या जीवाला धोका आहे असं वाटतं का? मी कायदा आणि संविधान पाळणारा माणूस आहे. अजित पवार म्हणाले की, कोणाच्याही जीवाला धोका असेल त्याला संरक्षण मिळायला हवं. ज्यानं तक्रार केलीय त्याला संरक्षण द्यावं. तुम्हाला वाटतं का माझ्यामुळे कुणाच्या जीवाला धोका आहे? मी कायदा आणि संविधान पाळणारा माणूस आहे. माझ्यामुळे धोका कसा असेल? असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला.

News18लोकमत
News18लोकमत

अण्णा हजारेंची 1 मे रोजी हत्या करणार, कुटुंबावर अन्याय झाल्याने तरुणाचा इशारा   भाजप पदाधिकाऱ्याची तक्रार काय? पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यानी दिली अजित पवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिलीय. भाजपचे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही मोजणी केली जात होती. अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल मी काय बोलू अशा शब्दात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच चंद्रकांत दादांनी केलेल्या वक्तव्यावर बोलणं टाळताना त्यांनी नो कमेंट्स असं म्हटलं. जरंडेश्वर कारखाना प्रकरणी आरोपपत्रात नाव वगळले असल्याच्या चर्चेवर अजित पवार यांनी ईडीने मला काही क्लीन चीट दिलेली नाही. ज्या चर्चा आहेत तसं काही झालं नाही असं स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात