जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'वॉशरूमला गेलो तरी....' नाराजीनाट्याबद्दल बोलले अजित पवार

'वॉशरूमला गेलो तरी....' नाराजीनाट्याबद्दल बोलले अजित पवार

अजित पवार यांनी स्वतःच यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी व्यासपीठावरुन नाराज होऊन निघून गेलो नव्हतो, तर वॉशरूमसाठी गेलो होतो, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 12 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात होतं. कारण, कार्यक्रम सुरू असतानाच अजित पवार हे व्यासपीठावरुन तडकाफडकी निघून गेले होते. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता अजित पवार यांनी स्वतःच यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी व्यासपीठावरुन नाराज होऊन निघून गेलो नव्हतो, तर वॉशरूमसाठी गेलो होतो, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ‘दादर’गिरी भोवणार, सदा सरवणकरांच्या घरी पोलीस पोहोचले, पिस्तुल होणार जमा? वॉशरूमसाठी गेलो तरी मीडियामध्ये अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या गेल्या, असं म्हणत अजित पवार यांनी नाराजीनाट्याबाबतच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. काय होती चर्चा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. या अधिवेशनात सर्व नेत्यांची भाषणे सुरू होती. मात्र, अजित पवार भाषण न करताच ते तडकाफडकी व्यासपीठावरुन निघून गेले. जयंत पाटील यांना आपल्यापूर्वी बोलण्याची संधी दिल्याने अजित पवार नाराज होऊन निघून गेल्याची चर्चा समोर आली होती. विशेष म्हणजे अजित पवार हे व्यासपीठावरुन निघून जात असताना प्रफुल्ल पटेल यांनी माईकवरुन अजित पवारांना थांबण्याची विनंती केल्याचंही दिसून आलं. मात्र, अजित पवार आलेच नाहीत. उदय सामंत यांना जाळून ठार मारू, नाना पटोलेंच्या समोरच रिफानरी विरोधकाची धमकी याआधी या सर्व घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार आपल्यावर अजिबात नाराज नाहीत, ते लघूशंकेसाठी सभागृहाबाहेर गेले होते, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात