मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'अजित पवार 48 तासांचे नवरदेव बनले', पहाटेच्या शपथविधीवर ओवेसींचा निशाणा

'अजित पवार 48 तासांचे नवरदेव बनले', पहाटेच्या शपथविधीवर ओवेसींचा निशाणा

"कोणी मुसलमान जर एमआयएममध्ये  (AIMIM)  गेला असता तर त्याला गद्दार म्हणून वागणूक दिली गेली असती. मात्र अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाऊन आले. त्यांच्या पक्षात घरातल्या लोकांना वेगळी वागणूक दिली जाते", असा टोला ओवेसी यांनी लगावला.

"कोणी मुसलमान जर एमआयएममध्ये (AIMIM) गेला असता तर त्याला गद्दार म्हणून वागणूक दिली गेली असती. मात्र अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाऊन आले. त्यांच्या पक्षात घरातल्या लोकांना वेगळी वागणूक दिली जाते", असा टोला ओवेसी यांनी लगावला.

"कोणी मुसलमान जर एमआयएममध्ये (AIMIM) गेला असता तर त्याला गद्दार म्हणून वागणूक दिली गेली असती. मात्र अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाऊन आले. त्यांच्या पक्षात घरातल्या लोकांना वेगळी वागणूक दिली जाते", असा टोला ओवेसी यांनी लगावला.

पुढे वाचा ...

सोलापूर, 23 नोव्हेंबर : एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीने ओवेसी (Asaduddin Owaisi) हे आज सोलापूर (Solapur) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सभा घेतली. या सभेवेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही सडकून टीका केली. "धरणात पाणी नाही तर मुतू का? म्हणणाऱ्याला डोकं नसेल, पण मला आहे", असा खोचक टोला त्यांनी लगावला. तसेच त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीवरुनही निशाणा साधला.

ओवेसींचा 27 नोव्हेंबरला 'चलो मुंबई'चा नारा

"सोलापूर जिल्हा प्रशासनाने बंद हॉलमध्ये सभा घ्यायला परवानगी दिली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद! मात्र यानंतर जी सभा होईल ती खुल्या मैदानात होईल. महाराष्ट्रातील मुसलमानांच्या आरक्षणासाठी 27 नोव्हेंबरला 'चलो मुंबई' हा मोर्चा होणार होता. मात्र आता 11 डिसेंबरला 'चलो मुंबई'ची रॅली निघणार. वक्फच्या जमिनी आणि मुस्लिम आरक्षणासाठी 'चलो मुंबई'चा कार्यक्रम 11 डिसेंबरला होणार आहे", अशी घोषणा ओवेसी यांनी केली.

हेही वाचा : सोलापूरला पोहचताच ओवेसींकडून चूक, अखेर दंड भरावा लागला

राष्ट्रवादी-काँग्रेसवर सडकून टीका

"गेल्या 50 वर्षात स्वतःला सेक्युलर म्हणावणाऱ्या पक्षांनी मुसलमानांना धोका दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणते, "एमआयएमला मत म्हणजे भाजप आणि शिवसेनेला मत". तसं वातावरण आवळ्याजावळ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून निर्माण केलं गेलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सेक्युलर आणि कम्यूनलचं सर्टिफिकेट देनं बंद करावं. त्यांच्या खोटेपणाचा महाराष्ट्रातील मुसलमान शिकार झाला. शिवसेना ही सेक्युलर पार्टी नाही ती भाजप सारखीच आहे. आम्हाला भाजपची बी टीम म्हणावाणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर एक झाले. तुम्ही ज्यांना मत दिलं त्या काँग्रेस-राष्ट्रवादीन शिवसेनेचा मुख्यमंत्री केला", असं ओवेसी म्हणाले.

'अजित पवार 48 तासांचे नवरदेव बनले'

"कोणी मुसलमान जर एमआयएममध्ये गेला असता तर त्याला गद्दार म्हणून वागणूक दिली गेली असती. मात्र अजित पवार भाजपसोबत जाऊन आले. त्यांच्या पक्षात घरातल्या लोकांना वेगळी वागणूक दिली जाते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये नवरदेव कोण होतं ते माहिती नाही. पण राष्ट्रवादीचे अजित पवार 48 तासांचे नवरदेव बनले होते", असा टोला ओवेसींनी लगावला. तसेच "धरणात पाणी नाही तर मुतू का म्हणणाऱ्याला डोकं नसलं. पण मला आहे", असाही घणाघात ओवेसींनी केला.

हेही वाचा : धडाकेबाज राज्यमंत्री बच्चू कडू ! जलसंपदा विभागात धाड, कामचुकार अधिकाऱ्यांना दणका

'जो मुख्यमंत्री बाबरी मशिदीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करतो तो...'

"स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सेक्युलिरिजमला जमिनीत गाडलं. तर उद्धव ठाकरेंनी विधानसभेत उभं राहून मंदिर आणि मशिदीबाबत वक्तव्य केलं. जो मुख्यमंत्री बाबरी मशिदीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करतो तो मुख्यमंत्री कसा सेक्युलर असू शकतो?", असा सवाल ओवेसींनी केला.

'आम्ही जिन्नाला नाकारलं'

"स्वतःच्या खिशात पेन ठेवा मुसलमानांनो. खिशातील कलम तुम्हाला जिवंत ठेवेल. तलवार तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. कलम जिवंत ठेवेल. मुसलमानांनो, त्याचं महत्त्व ओळखा. सेक्युलरिजमच्या कबरीवर महल बनवून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना राज्य करत आहेत. मुसलमानों सेक्युलरीजमचे गुलाम बनणे बंद करा. महाराष्ट्रात 11 टक्के मुसलमानांची लोकसंख्या आहे. सोलापुरातील जनतेला माझ्यावर प्रेम आहे हे मला माहिती होतं. पण माझ्या गाडीवर पण तुम्हाला प्रेम आहे. नवरदेवाची गाडी जेव्हा येते तेव्हा लोक नाचतात. आम्ही जिन्नाला नाकारलं आणि भारताच्या जमिनीला स्वतःच मानलं. देशाच्या संविधानाला आपलं केलं. उद्या मीडियावाले म्हणतील ओवेसीने भडकाऊ भाषण दिलं", असं ओवेसी यावेळी म्हणाले.

ओवेसी यांनी यावेळी मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांवरही भूमिका मांडली. "समीर वानखेडे म्हणतोय मी हिंदू आहे. तो दोन्ही आहे, पण अल्हाला माहितीय तो कोण आहे. महाराष्ट्रात एकही मुसलमान आयएएस नाही", असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.

हेही वाचा : परमबीर सिंग 'फरार', जुहूतल्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कोर्टाची ऑर्डर

"नळाला पाणी देत नाहीत त्यांना घरी बसावा"

"जे काँग्रेस-राष्ट्रवादी सोलापूरच्या जनतेला दररोज नळाला पाणी देत नाहीत त्यांना घरी बसावा. मी एमआयएमची मोटार लावून जातोय. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना यांना खेचून घरात बसवा. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बिल आणून मुसलमानांना आरक्षण द्या", असं आवाहन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना केलं.

'अमरावती हिंसाचाराला एमआयएमचं समर्थन नाही'

"अमरावतीमध्ये जो हिंसाचार झाला ते योग्य झालं नाही. महाराष्ट्रातील सरकारला शांतता आणि सुव्यवस्था राखता आली नाही. ते कोणत्याही धर्माचे असो हिंसेचं एमआयएम समर्थन करणार नाही", अशी भूमिका त्यांनी मांडली.

First published: