मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Rain Yellow Alert in Maharashtra : महाराष्ट्रातील या जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट, तर कुठे उन्हाचा चटका बसणार

Rain Yellow Alert in Maharashtra : महाराष्ट्रातील या जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट, तर कुठे उन्हाचा चटका बसणार

महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याची माहित हवामान विभागाने दिली आहे.

महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याची माहित हवामान विभागाने दिली आहे.

महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याची माहित हवामान विभागाने दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 29 जानेवारी : महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याची माहित हवामान विभागाने दिली आहे. मागच्या चार दिवसांपासून पावसाला पोषक हवामान व ढगाळ आकाशामुळे किमान तापमानात वाढ होत झाल्याने उन्हाचा चटका बसत आहे. तर राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

आज (ता. 29) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा वाढल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. तर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत.

हे ही वाचा : 12 Crore Buffalo : कोल्हापुरात आला 12 कोटींचा रेडा! पाहा तो का आहे इतका महाग? Video

आज (ता. 29) उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर पुणे, नगर, जालना, बीड जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानही वाढ झाली आहे. शनिवारी (ता. 28) पुणे येथे राज्यातील नीचांकी 11.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान 11 ते 20 अंशांच्या दरम्यान आहे. परंतु दुपारच्या दरम्यान उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. ढगाळ हवामानामुळे दुपारच्या वेळी राज्यात उकाडा जाणवत आहे. 

हे ही वाचा : Crop Damage Untimely Rain : अवकाळी पावसाने कांदा; केळी महाग होण्याची शक्यता, शेतीचे मोठे नुकसान

सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी 34.4 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली. याचबरोबर अग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली ठळक होत असून, बुधवारपर्यंत (ता. 1) श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत येण्याचे संकेत आहेत.

First published:

Tags: Aurangabad, Dhule, Nandurbar, Weather, Weather Update