जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रोहित पवार पुन्हा अडचणीत, राम शिंदेंचा गंभीर आरोप, अजितदादांचाही शब्द मोडला?

रोहित पवार पुन्हा अडचणीत, राम शिंदेंचा गंभीर आरोप, अजितदादांचाही शब्द मोडला?

रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या इंदापूर युनिटमध्ये उसाच गाळप परवाना नसतानाही सुरू करण्यात आला आहे.

रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या इंदापूर युनिटमध्ये उसाच गाळप परवाना नसतानाही सुरू करण्यात आला आहे.

रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या इंदापूर युनिटमध्ये उसाच गाळप परवाना नसतानाही सुरू करण्यात आला आहे.

  • -MIN READ Nagardeole,Ahmadnagar,Maharashtra
  • Last Updated :

नगर, 11 ऑक्टोबर : कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार मध्यंतरी अचानक ईडीच्या रडारवर आले होते. त्यामुळे रोहित पवार यांची चांगलीच धावपळ पाहण्यास मिळाली होती. पण, आता रोहित पवार आपल्या साखर कारखान्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आपले काका आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा शब्दच रोहित पवारांनी मोडीत काढला का? अशी चर्चाही रंगली आहे. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या इंदापूर युनिटमध्ये उसाच गाळप परवाना नसतानाही सुरू करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत यंदाचा हंगाम हा 15 ॲाक्टोबरपासून सुरू करावा असे निर्देश देण्यात आले होते. त्यासाठी साखर कारखान्यांनी साखर आयुक्तालयाकडून परवानगी घेणं गरजेच असतं. पण रोहित पवार यांच्या कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामासाठी परवानगी मिळावी असा अर्ज साखर आयुक्तालयाकडे केला आहे, मात्र ती परवानगी देण्यापूर्वीच त्यांनी गाळप सुरू केल्याचा आरोप विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांनी केला आहे. (निवडणूक आयोगाने दिलं नवं नाव, बाळासाहेबांच्या त्या फोटोसह एकनाथ शिंदेंची पहिली रिएक्शन) तसंच कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी असं पत्र साखर आयुक्तांना देत पुरावे म्हणून फोटो व्हिडीओ ही दिले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

त्यामुळे या प्रकरणात स्थानिक अधिकाऱ्यांना तातडीने पाहणीकरून कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेण्याच्या सूचना दिल्याच साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (नव्या चिन्हासोबतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं जुनं नातं, मशाल आणि सेनेचा संबंध काय?) यात महत्वाची बाब म्हणजे, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही ‘कारखान्यांनी शिस्त मोडतां कामा नये’ असं म्हणत योग्य कारवाई करा अशा सूचना दिल्याची चर्चा साखर आयुक्तालयात रंगली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात खासगी कारखान्याच्या स्पर्धेतून काका पुतण्यामध्ये संघर्ष निर्माण झालाय का असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात