अहमदनगर, 3 जुलै: निसर्गातील अनेक घटना किंवा ठिकाणं आपल्याला आश्चर्यचकित करणाऱ्या किंवा चमत्कारिक वाटाव्यात अशा असतात. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून वाहणाऱ्या मुळा नदीवर असाच एक सांडवा आहे. हरिचंद्रगडाकडून प्रचंड वेगाने व अवखळपणे वाहत येणारी मुळा नदी शिसवद गावाजवळून खडकाच्या पोटातून वाहते. या ठिकाणी नदी एका टांगेत ओलांडता येते अशी निसर्गनिर्मित जागा आहे, ज्यास सांडवा किंवा अस्वल उडी म्हणून ओळखलं जातं. शिसवद गावातील एक अनोखे दुर्लक्षित निसर्गशिल्प म्हणूनच या सांडव्याची ओळख आहे एका टांगेत ओलांडता येते नदी अकोले शहरापासून साधारण 35 किलोमिटर अंतरावर असणाऱ्या शिसवद गावाजवळून मुळा नदी प्रवाहित होत असते. या परिसरातील जास्त पर्जन्यमानामुळे पूर्वीपासून ही नदी एका टांगेत ओलांडण्यासाठी या जागेचा उपयोग केला जात आहे. हरिचंद्रगड परिसरातून उगम पावणारी मुळा नदी या परिसरातील जास्त पावसामुळे शिसवद गावापर्यंत पूर्ण प्रवाह भरून तुडुंब वाहत असते. मात्र शिसवद गावातील नदीच्या खोऱ्यात असणाऱ्या या 4 फुट रुंद 50 फूट खोलीच्या सांडव्यातूनच प्रवाहित होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना नदी ओलांडणे शक्य होते.
खडकांवर कोरीव असल्यासारखी शिल्पे या परिसरातील खोलगट भूभागामुळे मुळा नदी प्रचंड वेग धारण करते व या सांडव्यातून प्रवाहित होऊन खडकांवर आदळते त्यामुळे येथे अनेक रांजणखळगे पाहायला मिळतात. खडकांवरील हे शिल्प अगदी कोरीव असल्यासारखे भासतात. पूर्वीच्या काळी या जागेचे खूप महत्त्व होते, पावसाळ्यात मुळा नदीला पूर आल्यानंतर राजूरहून पाचनई, पेठेचीवाडी, खडकी, हरिचंद्रगडाकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग होता. म्हणजेच मुळा नदीचे हे अथांग पात्र ओलांडण्याची ही एकमेव जागा होती. Inspiring Story: बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी कशा प्रकारे तयार केली 250 वाणांची बँक? कसं पडलं अस्वल उडी नाव? या परिसरातील वयस्करांना विचारपूस केली तर ते या ठिकाणाबद्दल एक आख्यायका सांगतात. एकदा एक मदारी अस्वल (नडाग) घेऊन या ठिकाणाच्या सहाय्याने नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र उडी मारताना अस्वलाचा पाय घसरला व ते या सांडव्यात पडले. अस्वला बरोबर त्याचा मदारीही त्यात ओढला गेला. येथे नदीच्या पात्राची खोली खूप असल्याने मदारी व अस्वल पाण्यातून वरती येऊ शकले नाहीत. त्यामुळे मदारी व अस्वलाच्या या कहाणीमुळे या सांडव्याला अस्वल उडी, नडाग उडी असे नाव पडले, असं स्थानिक सांगतात.