प्रियांका बोबडे, प्रतिनिधी अहमदनगर, 9 मार्च: चांगले शिक्षक देशाचे चांगले नागरिक घडवतात. त्यामुळे शालेय जीवनात चांगले शिक्षक मिळणे गरजेचे असते. महाराष्ट्रात सरकारी शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या उपक्रमशीलतेची नेहमीच चर्चा होते. आपल्या विद्यार्थीभिमूख अध्यापन शैलीमुळे अनेक शिक्षकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव नगरपालिकेच्या शाळेतील शिक्षिका सुनिता इंगळे यापैकीच एक आहेत. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा विविध 45 पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. उपक्रमशील शिक्षिका सुनिता इंगळे सुनिता इंगळे या कोपरगांव नगरपालिकेच्या शाळा क्र. 6 मध्ये कार्यरत आहेत. गेल्या 18 वर्षांपासून त्या शैक्षणिक क्षेत्रात अध्यापन करत असून त्यांची एक वेगळीच शैली आहे. त्या स्वतः विद्यार्थ्यांसोबत अनेक वेगवेगळे उपक्रम राबवतात. शालेय साहित्यातून कृतीतून विद्यार्थ्यांना गोष्टी लवकर अवगत होतात आणि त्यांना समजणं सोपं जातं. त्यामुळे त्या आपल्या शाळेत अनेक वेगवेगळे उपक्रम राबवतात.
विविध उपक्रमांना राज्यभरातून प्रतिसाद सुनिता इंगळे यांनी कोरोना काळातील लॉकडऊनमध्ये ‘उतारावाचन’ हा उपक्रम घेतला. जवळपास 10 हजार विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला. या उपक्रमाला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. ‘ओळख पक्षांची’ हा पर्यावरणपूरक उपक्रम सध्या चालू आहे. यात दररोज एका पक्षांची माहीती दिली जाते. ‘एक बी उद्यासाठी’ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांकडून बिया जमा करुन त्या पावसाळ्याच्या आधी ओसाड माळरानावर, डोंगरावर टाकल्या जातात. वर्षभर पक्षांसाठी दाना - पाणी सोय केली जाते. विद्यार्थ्यांना शाळेत लागली शेतीची गोडी, पाहा छोट्या शेतकऱ्यांनी काय पिकवलंय? Photos संपूर्ण वर्गाचे घेतले पालकत्व शिक्षिका इंगळे यांनी संपूर्ण वर्गाचे पालकत्व घेतलेले आहे. सावित्रीबाईंचे जन्मस्थान नायगाव येथील ग्रंथालयासाठी पुस्तकदान समन्वयक म्हणून 700 पुस्तके दिली आहेत. आतापर्यंत रुपये 20 हजार रूपये किमतीची स्वलिखित ‘शालेय परीपाठ प्रश्नमंजुषा’ ही पुस्तके शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांना मोफत भेट दिली आहेत. तर दरवर्षी स्वतःचा व घरातील सदस्यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप साजरा करतात. ऑनलाईन माध्यमांतूनही ज्ञानार्जन सुनिता इंगळे यांचा ‘ज्ञानसंस्कार’ हा ब्लॉग आहे. या ब्लॉगला आतापर्यंत 97 हजार शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी भेट दिली आहेत वर्गाध्यापन करताना सातत्याने टाकाऊतून टिकाऊ शैक्षणिक साहित्याचा वापर केला जातो. शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, क्यू आर कोड निर्मिती असे अनेक उपक्रम त्यांनी विद्यार्थ्यासाठी राबवले आहेत. आई तुला सलाम! आधी जन्म, नंतर किडनी दान, या धाडसी आईची कहाणी एकदा वाचाच 45 पुरस्कारांनी सन्मानित उपक्रमशील शिक्षिका सुनिता इंगळे यांना आतापर्यंत विविध संस्थांकडून शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल 45 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सर फाऊंडेशन टिचर इनोव्हेशन अवार्ड - 2020, अहमदनगर जिल्हा शिक्षक बँक शताब्दीनिमित्त ‘सावित्रीची लेक’ पुरस्कार, ग्लोबल बंजारा फाऊंडेशन राज्यस्तरीय आधुनिक सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार, महात्मा फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार औरंगाबाद, महाराष्ट्र बालरक्षक प्रतिष्ठान तर्फे सावित्रीची लेक पुरस्कार, शैक्षणिक दिपस्तंभ प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.