जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आई तुला सलाम! आधी जन्म, नंतर किडनी दान, या धाडसी आईची कहाणी एकदा वाचाच

आई तुला सलाम! आधी जन्म, नंतर किडनी दान, या धाडसी आईची कहाणी एकदा वाचाच

वुमन्स डे

वुमन्स डे

आज 8 मार्च असून सर्वत्र महिला दिन साजरा केला जात आहे. महिलांवर आज खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 मार्च : आज 8 मार्च असून सर्वत्र महिला दिन साजरा केला जात आहे. महिलांवर आज खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तोच दुसरीकडे एका अशा महिलेची कहानी चर्चेचा विषय ठरत आहे जिने आपल्या मुलाला जीवनदान दिले. ही घटना मध्यप्रदेशमधील शिवपुरी शहरातील आहे. शिवपुरी रहवासी कुसुम आणि सुमन यांची ही कहानी आहे. 2004 मध्ये मध्य प्रदेशातील शिवपुरी शहरातील कृष्णपुरम येथे राहणारे सेवानिवृत्त आहार प्राचार्य पीके जैन आणि गृहाणी कुसुम जैन यांचा मुलगा ब्रिजेश जैन रिंकू यांना डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या औषधांमुळे दोन्ही किडनीमध्ये संसर्ग झाला होता. त्याचवेळी, वाढत्या संसर्गामुळे रिंकूची प्रकृती दिवसेंदिवस ढासळू लागली. आणि त्यांच्या दोन्ही किडनी खराब झाल्या. हेही वाचा  -  धाडस भोवलं; भल्यामोठ्या खांबावर अडकले तरुण तरुणी, आयुष्यात परत काहीच तुफानी करणार नाही 2012 मध्ये रिंकू यांना किडणी बदलण्याची गरज भासू लागली. तेव्हा आई कुसुम यांनी त्यांना आपली किडणी दान केली. महिला दिनी रिंकू म्हणतात की, ‘आई तू मला दोन वेळा जीवनदान दिलं’.

News18लोकमत
News18लोकमत

महिला दिनी आणखी एक कथा चर्चेत आहे. 2002 मध्ये मडीखेडा येथील सेवानिवृत्त एसडीओ प्रकाशसिंग रघुवंशी आणि ग्रहणी सुमन रघुवंशी यांचा अभियंता मुलगा लवकेश, दोघेही शिवपुरी येथील रहिवासी, यांची किडनी निकामी झाली होती. हा आजार इतका धोकादायक होता की 2003 मध्ये दिल्लीच्या एम्समध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचवेळी सुमनने आपल्या मुलाला किडनी देऊन नवजीवन दिले. सुमन रघुवंशी यांनी 1983 मध्ये लवकेशला जन्म दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात