Home /News /maharashtra /

पत्नीची शेवटची इच्छा केली पूर्ण; 80 वर्षीय डॉक्टरने साईबाबांना चढवला 40 लाखांचा सोन्याचा मुकूट

पत्नीची शेवटची इच्छा केली पूर्ण; 80 वर्षीय डॉक्टरने साईबाबांना चढवला 40 लाखांचा सोन्याचा मुकूट

हैद्राबाद येथील साईभक्त डॉ. रामकृष्णा यांनी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुमारे 40 लाख रुपयांचा सुवर्ण मुकट साईबाबांच्या (Shirdi Sai Baba) चरणी अर्पण केला आहे.

सुनिल दवंगे, प्रतिनिधी अहमदनगर 22 जुलै : फकीरी परंपरेत आयुष्‍य काढलेल्‍या आणि समाजाच्‍या भल्‍यासाठी जीवन खर्ची घातलेल्‍या साईबाबांच्‍या खजिन्‍यात आणखी एका सोन्‍याच्‍या हीरेजडीत मुकुटाची भर पडली आहे. हैद्राबाद येथील साईभक्त डॉ. रामकृष्णा यांनी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुमारे 40 लाख रुपयांचा सुवर्ण मुकट साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे. पत्नीची शेवटची इच्छा साईंना मुकूट चढवण्याची होती, ती पूर्ण केल्याचं समाधान साईभक्त डॉ. रामकृष्ण यांच्या चेह-यावर दिसून येत आहे. साईबाबांना आज दान स्वरुपात मिळालेला मुकूट अतिशय आकर्षक आहे. मुकुटावर डायमंडचा साज चढवण्यात आला असून, ओम या नावाची छबी रेखाटण्यात आली आहे. तर मुकूटाच्या वरच्या भागाला मोरपिसाने सजवण्यात आलं आहे. हा मुकूट दानशूर भाविकाच्या इच्छेनुसार आज मध्यान्ह आरतीदरम्यान मूर्तीवर चढवण्यात येत आहे . मुंबईकरांची होणार दूषित पाण्यापासून सुटका, IIT चं तंत्रज्ञान ठरणार गेमचेंजर साईभक्त डॉ. रामकृष्ण यावेळी सांगतात की, सन 1992 मध्ये ते सपत्नीक शिर्डीला साईबाबा दर्शनसाठी आले होते. यावेळी आरतीदरम्यान मुकूट चढवत असल्याचं त्यांची पत्नी रत्नाम्मा यांनी पाहिले. तेव्हाच त्यांनी बाबांना असाच सोन्याचा मुकूट चढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परिस्थिती अभावी तेव्हा ते शक्य झालं नाही. दरम्यानच्या काळात रत्नाम्मा यांचं निधन झालं. मात्र पत्नीची शेवटची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. यावेळी पैसे जमवण्यासाठी डॉ रामकृष्णा यांनी अमेरिकेत काम सुरु केलं. पैशाची पुर्तता करुन ते भारतात आले आणि हैद्राबाद येथे बाबांसाठी सोन्याचा मुकूट तयार करुन घेतला. ज्याचं वजन 742 ग्रॅम असल्याचं सांगितलं जात आहे. तर किंमत सुमारे 40 लाख रुपये असल्याचं साईभक्त रामकृष्णा यांनी सांगितलं आहे. गणपतीची मूर्ती बुक करण्याआधी ही बातमी वाचा; शिंदे-फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश डॉ. रामकृष्णा म्हणाले, 'साईबाबांच्या इच्छेपुढे काहीच नसतं, आज वयाच्या 88 व्या वर्षी पत्नीची इच्छा पूर्ण करताना खूप आनंद होत आहे. तिनं मागितलेलं हे मागणं मी पूर्ण करत आहे. माझी दोन मुलं आणि दोन मुली यांच्यासोबत आज बाबांच्या दरबारात हे दान देत आहे'. साईंना दानाची प्रक्रिया शिर्डी साईबाबांना येणारे गुप्तदान सोने-चांदी, रुपये पैसे हे मंदिरातील दानपात्रात टाकले जाते. त्याच बरोबर देणगी काऊंटरवरही भाविक दान करुन रीतसर पावती घेतात. सोने चांदीचे मोठे दान जसे मुकूट, सवर्ण हार , भांडी , मंदिरातील वापराच्या वस्तू , अशा दानाचे साईसंस्थान टाकसाळकडून मुल्यांक केले जाते. यात घडवण्याची मजुरी धरली जात नाही. फक्त मूळ सोन्याची किमंतीच दानात जमा करतात.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Sai Baba Of Shirdi (Deity), Shirdi sai baba sansthan

पुढील बातम्या