मुंबई, 7 सप्टेंबर : मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागामध्ये संध्याकाळी वीजांच्या कडकडाटांसह पाऊस (Mumbai Rain Traffic Updates) सुरू झाला आहे. कल्याण-डोंबिवली भागामध्ये तर काही भागांमध्ये वीजांचा कडकडाट आणि पावसामुळे वीजपुरवठाही खंडीत झाला होता. दरम्यान या पावसाचा फटका मुंबईतल्या ट्रॅफिकलाही बसला आहे, त्यामुळे ऑफिसमधून घरी निघताना एकदा गुगल मॅपवर तुमच्या परिसरातली ट्रॅफिकची स्थिती नक्की चेक करा. सध्या तरी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास दादर हिंदमाता, घोडबंदर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि शीळफाटा या भागामध्ये ट्रॅफिक पाहायला मिळत आहे. दादर हिंदमातामधला Live Traffic
आजपासून (ता.07) राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता असून, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान गणपती विसर्जनावेळी नागरिकांची तारांबळ उडण्यची शक्यता आहे. आज याची प्रचिती मुंबईकरांना आली.
Mumbai Rain : मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये पावसाची धुवांधार बॅटींग!#thane #mumbai pic.twitter.com/5bpHNtqdhV
— News18Lokmat (@News18lokmat) September 7, 2022
गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर कोकणातून चाकरमानी मुंबईत परतले असून त्यांच्या कामावरही रुजू झाले आहेत, पण सुट्टीनंतरच्या पहिल्याच आठवड्यात नोकरदार वर्गाला पाऊस आणि मुंबईच्या ट्रॅफिकचा त्रास पुन्हा एकदा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.