Home /News /maharashtra /

घराच्या छतावर झोपले अन् दाम्पत्य खाली आलेच नाही, नगरमधील धक्कादायक घटना

घराच्या छतावर झोपले अन् दाम्पत्य खाली आलेच नाही, नगरमधील धक्कादायक घटना

 प्रथमदर्शनी मृतदेहाच्या चेहऱ्यावर काही खूणा दिसून येत असल्याने हत्येची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रथमदर्शनी मृतदेहाच्या चेहऱ्यावर काही खूणा दिसून येत असल्याने हत्येची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रथमदर्शनी मृतदेहाच्या चेहऱ्यावर काही खूणा दिसून येत असल्याने हत्येची शक्यता वर्तवली जात आहे.

    सुनिल दवंगे,प्रतिनिधी अहमदनगर, 01 जून  : उन्हाळ्याच्या दिवसात घराच्या छतावर झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याचे (Elderly couple) कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना अहमदनगर (ahamadnagar) जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी मृतदेहाच्या चेहऱ्यावर काही खूणा दिसून येत असल्याने हत्येची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील आपेगाव भुजाडे वस्ती इथं ही घटना घडली आहे. दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय 75) आणि पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय 65) असे मयत पती पत्नीचे नाव आहे. हे दाम्पत्य आपेगाव शिवारात आपल्या शेतातील वस्तीवर राहत होते.आज दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहे. (Mrunmayee Photos: डॉलीला पडली चंद्राची भुरळ! मृण्मयीचं मराठमोळं फोटोशूट) दत्तात्रय गंगाधर भुजाडे  व त्यांची पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे हे दोघेच आपेगाव शिवारात आपल्या शेतात राहत होते. त्यांना दोन विवाहित मुले असून ते कामानिमित्त पुणे येथे राहतात. दोन दिवसांपूर्वी सोमवार दि. 30 मे रोजी सायंकाळी हे दोघे पती पत्नी तळेगाव येथे सप्ताहच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यांनतर त्यांच्या मुलाने नेहमीप्रमाणे त्यांना फोन केले असता त्यांनी फोन उचलला नाही. घराशेजारील पोलवर चढल्यानंतर घटना समजली दरम्यान, मुलाने आज बुधवार दि. 1 जून रोजी सांयकाळी त्यांच्या चुलत भावाला फोन करून चौकशी करण्यास सांगितले असता चुलत भाऊ एका जोडीदारासोबत वस्तीवर गेला असता त्या ठिकाणी घराचे दरवाजे बंद होते. त्यांनी घरा शेजारी असलेल्या पोलवर चढून पाहिले असता घराच्या छतावर ते दोघे अंथरुणावर मयत अवस्थेत असल्याचे त्यांना आढळून आले. तात्काळ सदर घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील,  गावकरी व पोलिसांना दिली सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. कोपरगाव तालुका पोलिसांनी पंचनामा करून सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. (कमरेवर हात ठेऊन भांडाव असं वाटतंय' ट्रोलिंगवर व्यक्त झाली स्रेहलता वसईकर) दरम्यान, उन्हाळ्याचे दिवस असल्याने स्लॅबच्या घरात गरम होत असल्याने हे दाम्पत्य छतावर झोपलेले होते. घराचे दरवाजे हे आतूनच बंद होते. आरोपींनी घराच्या छतावरच्या दरवाजाने आत प्रवेश करून घरामधील सामानाची उचका पाचक केलेली दिसून येत आहे. त्यामुळे सदर घटना प्रथमदर्शनी दरोड्याची दिसत असली तरी या दाम्पत्याचा खून झाला की आणखी काही काही कारण होते, याबाबत पुढील तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या