मुंबई, 1 जून : अभिनेत्री स्रेहलता वसईकर ( Snehlata Vasaikar) ऐतिहासिक भूमिकांसाठी खास ओळखली जाते. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेत तिने साकारलेली सोयरा बाईसाहेब ही भूमिका प्रचंड गाजली. स्नेहलता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नेहमीच ती तिच्या हटके फोटोशूटमुळे सर्वांचे लक्षवेधून घेताना दिसते. मात्र अनेकदा तिला यामुळं ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे. नुकतेच तिन तिचे तीन ( Snehlata Vasaikar latest photos) बोल्ड फोटो शेअर केले आहेत. शिवाय हे फोटो शेअर करण्यामागचं कारण देखील तिनं या पोस्टमध्ये सांगितलं आहे. सध्या स्नेहलताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच ( Snehlata Vasaikar Troll) चर्चेत आली आहे. स्नेहलताना तिचे व्हाईट ड्रेसमधील तीन बोल्ड फोटो इन्स्टाला पोस्टला केलं आहेत. हे तीन फोटो पोस्ट करण्यामागचं कारण देखील तिनं या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे. स्नेहलता या पोस्टमध्ये म्हणते की,Caption ऐवजी आज हे नक्की वाचा… नमस्कार मी स्नेहलता वसईकर, अर्थातच अभिनेत्री असल्यामुळे वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून मी आपल्या समोर येतं असते. माझ्या प्रत्येक भूमिकेवर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं… काही चुकलं तर समजूनही घेतलंत. ऐतिहासिक भूमिकांपासून मॉडर्न भूमिका असा प्रवास केला. प्रत्येक भूमिकेतून, अनुभवांमधून खूप गोष्टी शिकले. अजूनही वैविध्यपूर्ण भूमिका साकारायच्या आहेत, त्यातूनही अनेक गोष्टी शिकायच्या आहेत…. पण काय सांगू…? हे ट्रोलर्स…. वाचा- ‘सगळीकडे शेपूट बरोबर ’ प्राजक्ताची भाची आली आत्तूच्या शहरी अन् करतेय धमाल मस्ती (पोस्ट मधील पहिला फोटो), कधी-कधी असंच कमरेवर हात ठेऊन या ट्रोलर्सबरोबर भांडाव असं वाटतंय… त्यांना सांगावस वाटतं, तुमच्यावरील ‘संस्कार’ तुमच्या कपड्यांवरून नाही तर तुमच्या विचारांमधून कळतात. थोरा-मोठ्यांचे गुण आपल्या अंगी उतरवायचे असतात, त्यातील अनेक गोष्टी आपल्या आचरणात आणायच्या असतात… एवढं सगळं बोलूनही ‘ट्रोलर्स’ना मात्र काही कळणार नाही, न त्यांच्या वागण्या-बोलण्यात, सोशल मीडियावर व्यक्त होण्यात काही बदल होणारं आहे. याउलट त्यांच्या चुकीच्या वक्तव्याचा, कमेंट्सचं ते समर्थन आणि काही जण त्यांची पाठराखण करतात… वाचा- ‘यारो दोस्ती बड़ी हसीन है… ‘; मराठी सेलेब्सकडून KK यांना भावपूर्ण आदरांजली म्हणून (हा दुसरा फोटो), त्यांच्यात न झालेला बदल पाहून, ‘पालथ्या घड्यावर पाणी…’ म्हणत स्वतःचं डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटतो… कलाकार हा आशावादी सुद्धा असतो. ‘मी एक कलाकार आहे आणि माझं एक खाजगी आयुष्य सुद्धा आहे तुम्ही समजून घ्याल’, अशी आशा करते. ऐतिहासिक मालिकेमधून भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेशी प्रामाणिक राहण्याचा पूर्ण प्रयत्न असतो आणि ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे आपण नव्हे याचं भानही… आम्ही कलाकार फक्त निमित्तमात्र असतो. जर अशा भूमिका साकारल्यानंतर त्या थोर व्यक्तिमत्त्वांचा जागी आम्हाला नेऊन बसवत असाल तर त्या थोर व्यक्तिमत्त्वांचा याहून मोठा अपमान काहीच नसेल…. पुन्हा सांगते मी रील आणि रियल लाईफ ही वेगवेगळी ठेवणच पसंत करते.
म्हणून (हा तिसरा फोटो) हाताची घडी घालून निवांत….. तुम्हा मायबाप प्रेक्षकांना माझी बाजू समजावून सांगण्याची तशी फार गरज नाही हे मला ठाऊक आहे… फक्त, आम्ही कलाकारही माणूस असतो…. वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी भुकेलेला…तुमचीच,स्नेहलता वसईकर. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. चाहत्यांनी देखील तिला पाठिंबा दिला आहे.