हरिष दिमोटे (अहमदनगर), 16 डिसेंबर : अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजकीय वादातून मनसेच्याच जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेश लूटे यांच्यावर काल रात्री अचानक हल्ला झाला. त्यांच्यावर डोक्यात टणक वस्तूसह धारदार शस्राने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. लुटे यांच्या डोक्यात लूटे यांच्यावर काल रात्री अचानक हल्ला झाला. त्यांच्यावर डोक्यात टणक वस्तूसह धारदार शस्राने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हल्ल्यात लुटे यांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने शिर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा : कोकणात राजकीय शिमगा? मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते लावणार हजेरी?
राहाता तालुक्यातील साकुरी गावात ही घटना घडली आहे. राजकीय वाद किंवा पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. दरम्यान हे हल्लेखोर त्याच साकुरी गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी युवक फरार झाल्याने पोलिसांकडून तपास सुरू केला आहे.
दरम्यान हल्लेखोराचे नाव आशिष पारखे असल्याचे बोलले जात आहे. मागील पंचवार्षिकला राजेश लूटे हे साकुरी ग्रामपंचायतचे सदस्य होते. त्यांच्या प्रभागातील विकास कामांच्या मुद्द्यावरून संबंधित युवक गेल्या काही दिवसांपासून लूटे यांच्या विरोधात लिखाण करत होते. तसेच दोन तीन दिवसांपूर्वी याबाबत शाब्दिक वाद झालेले होते. सध्या साकुरी ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. राजेश लूटे यांचा लहान भाऊ सदस्य पदासाठी लोकसेवा मंडळाकडून निवडणुकीला उभा आहे.
हे ही वाचा : ‘पुरस्कार परत घेणे हा डरपोकपणाच’, शिवसेनेचा शिंदे सरकारवर घणाघात
त्या अनुषंगाने राजेश लूटे हे काल रात्री आठ वाजेच्या दरम्यान साकुरी येथील इंद्रनगर भागात काही व्यावसायिकांच्या गाठीभेटी घेत होते. यावेळी पूर्ववैमनस्यातून संबंधित युवकाने लूटे यांच्या डोक्यात फरशी टाकली व चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात राजेश लूटे यांच्या डोक्याला जबरी मार लागला असून रात्री त्यांना शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता. आज गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.