जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शेवगावमध्ये मिरवणुकीदरम्यान मोठा गोंधळ; तरुणांनी दगडफेक करत वाहनं फोडली, काय घडलं?

शेवगावमध्ये मिरवणुकीदरम्यान मोठा गोंधळ; तरुणांनी दगडफेक करत वाहनं फोडली, काय घडलं?

मिरवणुकीदरम्यान मोठा गोंधळ

मिरवणुकीदरम्यान मोठा गोंधळ

छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे..

  • -MIN READ Ahmadnagar,Maharashtra
  • Last Updated :

अहमदनगर 15 मे : छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे.. जमावाने दुकानांचं आणि वाहनांचं नुकसान केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शहरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मिरवणूक निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी होते. मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने एका गटाने दगडफेक केल्याची माहिती आहे. मध्यरात्री अल्पवयीन मुलीसोबत रस्त्यावर धक्कादायक घटना, अमरावतीत खळबळ तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की, धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक करण्यात आली. यामुळे अफवा पसरून दोन्ही बाजूने दगडफेक झाली. त्यामुळे पळापळ झाली. गोंधळामुळे व्यावसायिकांनी दुकाने पटापट बंद केली. जमावाने यावेळी वाहनांवरही दगडफेक करुन त्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. यावेळी काही दुकानांवरही हल्ला चढवत तोडफोड करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जमावाला पांगवण्यास पोलिसांना यश आलं आहे. यानंतर सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात येत आहे. यासोबतच दगडफेक करणाऱ्यांचा शोधही सुरू आहे. अहमदनगरहून शेवगावला मोठा बंदोबस्त पाठवण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे शहरात एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु पोलिसांनी काही वेळात परिस्थिती आटोक्यात आणली .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात