जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / मध्यरात्री अल्पवयीन मुलीसोबत रस्त्यावर धक्कादायक घटना, अमरावतीत खळबळ

मध्यरात्री अल्पवयीन मुलीसोबत रस्त्यावर धक्कादायक घटना, अमरावतीत खळबळ

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मध्यरात्रीच्या सुमारास अमरावती शहरात एका मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडला.

  • -MIN READ Amravati,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 14 मे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुझ्या मैत्रिणीला बाहेर काढ, आपण दोघे रूममध्ये राहू, अशी धमकी देत एका मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी ही अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात भाड्याने राहते. ही धक्कादायक घटना 13 मे रोजी रात्री 1.15च्या सुमारास गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण - एक अल्पवयीन मुलगी रोडवरून तिच्या खोलीकडे जात होती. त्यावेळी 40 ते 45 वर्षे वयोगटातील एक अनोळखी व्यक्ती तिथे दुचाकीसह उभा होता. यावेळी त्याने तिला आवाज दिला. तसेच एवढ्या रात्री का फिरत आहे, असे विचारले. त्यावर, काका मला मेडिकल संदर्भात काम होते, त्यामुळे मी बाहेर गेली होती, असे ती त्या व्यक्तीला दिले.

News18लोकमत
News18लोकमत

यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने तू तुझ्या मित्रासोबत रात्रीला फिरते, तुझी पोलिसांत तक्रार करतो, अशी धमकी त्याने दिली. तसेच आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर मला शारिरीक संबंध ठेऊ दे, मी तुला पैसे देईन, तुझ्या मैत्रिणीला रुमबाहेर काढ, आपण दोघे रूममध्ये राहू, असे म्हटले. तसेच त्याने तिचा मोबाईल नंबरही घेतला. यानंतर त्याने तिच्या मोबाईलवर मिसकॉल देखील दिला. त्याने त्याचवेळी तिचा विनयभंग केला. या सर्व प्रकाराने ही मुलगी घाबरली होती. त्या मुलीने त्याच्या हाताला झटका दिला आणि ती रूमकडे धावली. यानंतर पीडित मुलीने थोड्यावेळाने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे चारच्या सुमारास एका अनोळखी इसमाविरूध्द विनयभंग, धमकी व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला. त्याबाबत सायबर पोलिसांची मदतदेखील घेतली जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात