कृष्ण बहादुर शुक्ला, प्रतिनिधी अयोध्या, 16 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधांतून खून, बलात्कार तसेच हत्येच्याही घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेश राज्यातील अयोध्या येथे लव्ह जिहादचे प्रकरण समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. सामूहिक बलात्कारानंतर बळजबरीने धर्मांतरण केल्याचा आरोप एका मुलीने केला आहे. याप्रकरणी पीडिता आणि तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर महिला पोलिसांनी आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, धर्मांतरणाचा प्रयत्न आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीत काय म्हटले - महिला पोलिसांनी याप्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीत पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे की, आरोपी हे लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना गोड बोलून आपल्या जाळ्यात अडवकून त्यांना विकतात. मुख्य आरोपी खालिद अंसारी विवाहित असून त्याला मुलेही आहेत. त्याने त्यांच्या 16 वर्षीय मुलीला आपल्या जाळ्यात अडकवत मित्रासोबत मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर तो तिला वेगवेगळ्या मजार आणि मशिदींमध्ये घेऊन गेला. याठिकाणी तिचे धर्मांतरण केल्यानंतर तिचे लग्न लावण्याचा प्रयत्न करत होता.
पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे, त्यांची मुलगी शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. अभ्यासादरम्यान, तिची एका विद्यार्थिनीसोब मैत्री झाली होती. तिच्याच माध्यमातून आरोपी शिवम यादव सोबत त्यांच्या मुलीची ओळख झाली. आरोपी शिवम यादवने त्याचा सहकारी खालिद अंसारी याच्यासोबत ओळख करुन दिली. यानंतर तिच्याशी गोड बोलून तिच्या आपल्या जाळ्यात अडकवून खालिद अंसारी आणि शिवम यादव यांनी त्यांच्या मुलीसोबत दुष्कर्म केले. बलात्कारानंतर खालिद अंसारी पीडितेसोबत लग्न करण्याचे नाटक करु लागला. तो तिला धर्मांतरण करण्यासाठी तिने अनेक मजार आणि मशिदीत घेऊन गेला. इथं मौलाना ने तिला पाणी पाजून तिला पवित्र होण्याबाबत सांगितले आणि लग्न (निकाह) करण्याचा सल्ला दिला. दिलेल्या एफआयआर नुसार, 13 जुलैला पीडितेचे नातेवाईक तिला तिच्या मैत्रिणीच्या घरुन घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर पीडितेने सांगितले की, आरोपी खालिद अंसारीने तिचा मोबाईल हिसकावून घेतला होता. यामुळे ती घरच्यांशी संपर्क करू शकली नाही. दरम्यान, याप्रकरणी पीडिता आणि तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर महिला पोलिसांनी आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, धर्मांतरणाचा प्रयत्न आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.