मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चुकीच्या बातम्या दिल्या तर...,लंपीरोगाबद्दल राधाकृष्ण विखे पाटलांचा थेट इशारा

चुकीच्या बातम्या दिल्या तर...,लंपीरोगाबद्दल राधाकृष्ण विखे पाटलांचा थेट इशारा

 कोरोनानंतर राज्यासमोर आता लंपी आजाराचे संकट उभे ठाकले आहे. लंपीच्या आजारामुळे अनेक अफवांना पेव फुटला आहे

कोरोनानंतर राज्यासमोर आता लंपी आजाराचे संकट उभे ठाकले आहे. लंपीच्या आजारामुळे अनेक अफवांना पेव फुटला आहे

कोरोनानंतर राज्यासमोर आता लंपी आजाराचे संकट उभे ठाकले आहे. लंपीच्या आजारामुळे अनेक अफवांना पेव फुटला आहे

अहमदनगर, 24 सप्टेंबर : कोरोनानंतर राज्यासमोर आता लंपी आजाराचे संकट उभे ठाकले आहे. लंपीच्या आजारामुळे अनेक अफवांना पेव फुटला आहे. याची दखल घेत चुकीच्या बातम्या देणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. लंपी आजारामुळे शेकडो जनावरं बाधीत झाले आहे. लंपी आजाराला आळा घालण्याठी लसीकरणाची मोहिम सुरू आहे. मात्र, गायीच्या दुधाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबद्दल चिंता व्यक्त करत कडक इशारा दिला आहे. ('शिंदे गटाचे आमदार नाराज असतील तर मुख्यमंत्र्यांनी...'; चंद्रशेखर बावनकुळेंची महत्त्वाची प्रतिक्रिया) 'राज्यामध्ये दुधाचे उत्पादन जास्त होतंय ते कुठे कमी झालेल नाही विनाकारण सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे सामान्य नागरिकांना घाबरून जाऊ नये, सोशल मीडियाच्या माध्यमातून  फेक बातम्या किंवा सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असेल तर अशा बातम्या देत देणाऱ्यांवर सायबर क्राईमच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात येईल, असे आदेश राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश दिले आहे. (सितारामन यांनी बारामतीकरांचा हात उंचावून मिळवला होकार; पवारांना लगावला भरसभेतून टोला) तसंच, ग्रामीण भागात आजही शेतकऱ्याला मोजणी करायची असेल तर एक किंवा दीड वर्ष वाट पाहावी लागते आणि जमिनी खरेदी केल्यावर सातबारा नोंदणीसाठी अनेक ठिकाणी आडवणूक केली जाते. हे टाळण्यासाठी  राज्य शासनाने अर्जदाराने अर्ज केल्यास एका महिन्याच्या आत नाव नोंदणी किंवा मोजणी झाली पाहिजे यासाठी प्रायोजित तत्त्वावर अहमदनगर जिल्ह्यात हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. मागील एका महिन्यात पूर्ण करून त्यापुढे मोजणी किंवा नोंद लावायचे असल्यास एका महिन्यात ती लावण्यात यावी अशी तरतूद करणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या