अहमदनगर, 15 सप्टेंबर : अहमदनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीतून मृतदेहांची चक्क राख गायब होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे गावात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. स्मशानभूमीतली राख एका रात्रीत कुठे गायब होतेय? असा प्रश्न गावकऱ्यांना सतावतोय. विशेष म्हणजे मृतदेहांची राख गायब होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी तीन ते चार वेळा हा सगळा प्रकार घडला आहे. संबंधित प्रकार वारंवार घडत असल्याने गावात खळबळ उडाली आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील स्मशानभूमीतील राखेला चक्क पाय फुटल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. अंत्यविधीनंतर उरणारी राख अगदी अस्थीसह गायब होत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. आतापर्यंत तीन ते चार वेळा अशा घटना घडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ( पहाटेच्या सुमारास घरात शिरले, बंदुक दाखवली, महिलांनाही मारहाण, अहमदनगरमध्ये सशस्त्र दरोडा ) करंजी गावातील लिलाबाई वामन यांचे सोमवारी दुःखत निधन झाले. करंजी गावातील उत्तरेश्वराच्या मंदिराजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचे नातेवाईक अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले तर त्यांच्या अस्थी गायब होत्या. लिलाबाई यांच्या अंगावर पावणे दोन तोळे सोने होते. त्यांना नथ घालण्याची हौश होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना नवीन नथ घातली होती. दरम्यान, दाग दागिने गेले याचे दुःख वाटत नाही. पण काही घटनांमध्ये थेट अस्थीच चोरून नेल्या जात असल्याने संताप व्यक्त होतोय. महिलांचीच राख चोरीला जात असल्याने मृत महिलेच्या राखेतील दागिण्यांचे आमिषापोटी या घटना घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आतापर्यंत तीन ते चार वेळेला असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.