अहमदनगर, 15 सप्टेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोपरगावमध्ये दरडोखोरांच्या एका टोळीने सशस्त्र दरोडा टाकला आहे. आरोपींनी एका घरावर सशस्त्र दरोडा टाकला. या दरोड्यात त्यांनी लाखोंचा ऐवज चोरुन नेला आहे. आरोपी दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना देखील मारहाण केली आहे. या मारहाणीत तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावात पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी अनिल सोनवणे यांच्या घरावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी घरातील रोख रक्कम आणि सोने-नाणे असा लाखोंचा ऐवज लुटून नेलाय. हत्यारासह आलेल्या सहा ते सात जणांच्या टोळीने अनिल सोनवणे यांच्या घरात हैदोस घातला. आरोपींनी त्यांना मारहाण करत घरात पूर्ण पसारा केला. अनिल सोनवणे यांची आई आणि वहिनीलाही मारहाण करून दरोडेखोरांनी ऐवज लूटून नेलाय. ( महिला भक्ताचा विनयभंग करणाऱ्या लोमटे महाराजाला पाच दिवसांची पोलीस कोठडी ) याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना या घटनेचा तपास लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. नेमकी काय घटना घडली होती याबद्दल माहिती घरमालक अनिल सोनवणे यांनी दिलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.