मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

20 हजाराला दिवसाला 700 रुपयांचं व्याज, 15 सावकारांनी लुटलं, 'शिवराम वडेवाले'च्या मालकाची आत्महत्या

20 हजाराला दिवसाला 700 रुपयांचं व्याज, 15 सावकारांनी लुटलं, 'शिवराम वडेवाले'च्या मालकाची आत्महत्या

अहमदनगमध्ये वडापाव विक्रेत्याची आत्महत्या

अहमदनगमध्ये वडापाव विक्रेत्याची आत्महत्या

श्रीगोंदा येथील 'शिवराम वडेवाले'चे मालक शिवराम रमेश वहाडणे आत्महत्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी 15 सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर, 13 ऑगस्ट : श्रीगोंदा येथील 'शिवराम वडेवाले'चे मालक शिवराम रमेश वहाडणे आत्महत्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी 15 सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी 9 जणांना अटक केली आहे. तर 6 जण फरार आहेत. श्रीगोंदा शहरातील शिवराम वडेवाले'चे मालक शिवराम रमेश वहाडणे यांनी आत्महत्या केलीय. शिवराज वहाडणे यांनी काही खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जापोट अव्वाच्यासव्वा व्याजाने पैसे उकळून त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. शिवराम यांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याबाबत शिवराम यांची पत्नी वंदना वहाडणे यांनी पोलिसात तक्रार दिली होती. शिवराम वहाडणे यांच्या वहीमध्ये सावकारांनी दरमहा 10 ते 40 टक्क्यांपर्यंत व्याजाने 10 लाख रुपये दिल्याच्या नोंदी आढळल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी वहाडणे यांच्या वह्या जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे एका सावकाराने तर 20 हजार रुपयांच्या कर्जावर दररोज 700 रुपये व्याज उकळल्याचे समोर आलंय. त्यामुळे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केलीय. (मुख्यमंत्र्यांच्याच बालेकिल्ल्यात सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर, तरुणाला प्रचंड मारहाण, नेमकं प्रकरण काय?) वंदना वहाडणे यांच्या फिर्यादीवरून जयसिंग म्हस्के, शहाजी झुंजरुक, कांतीलाल कोकाटे, बापू चव्हाण, अक्षय कैयतके, राहुल धोत्रे, भास्कर सांगळे, प्रवीण जाधव, धीरज भोसले, आकाश भोसले, राहुल खामकर, संतोष शिंदे, विनोद घोडके, मुन्ना काळे, राजू बोरुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्यासह पथकाने जयसिंग म्हस्के, कांतीलाल कोकाटे, अक्षय कैयतके, राहुल धोत्रे, भास्कर सांगळे, राजू बोरुडे, बापू चव्हाण यांना तातडीने अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून इतरांचा शोध सुरू आहे.
First published:

Tags: Crime, Suicide

पुढील बातम्या