साहेबराव कोकणे (अहमदनगर), 11 ऑगस्ट : अहमदनगर शहराच्या उपनगर परिसरातील ओढे आणि नाले बुजवल्यामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी घुसत आहे. याबाबत शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांनी दोन वर्षांपूर्वी पीएम पोर्टलवर तक्रार केली. (Ahmednagar Municipal) मात्र, यावर कोणतीही कार्यवाही न करता मनपाकडून दिल्या गेलेल्या पत्राचा संदर्भ टाकून ती तक्रार निकाली काढली गेली. आजतागायत बुजवलेले ओढे आणि नाले मोकळे झाले नाहीत. असे असतानाही मनपाने चक्क पंतप्रधान कार्यालयालाही दिशाभूल करणारी माहिती देऊन फसवणूक केल्याचा आरोप योगीराज गाडे यांनी केला. महानगरपालिकेचे अधिकारी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अहमदनगर शहरांमधील उपनगर भागात अधिकारी बिल्डर यांच्या संगनमताने जवळपास 21 ओढे आणि नाले बुजवले आहेत. या भागात जवळपास 35 ते 40 हजार बेकायदेशीर बांधकाम झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी उपनगर भागामध्ये अशाच प्रकारे पाऊस पडल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेले होते. स्थानिक पातळीवरती कारवाई न झाल्याने शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती.
हे ही वाचा : शपथ घेतल्यानंतर 2 दिवसांनी आठवले बाळासाहेब, शिवतीर्थावर पोहोचले शिंदे गटाचे मंत्री!
पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर ही तक्रार केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून याची विचारणा झाली. त्यावेळेस अहमदनगर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अर्जदारांना पत्राद्वारे कळवले असून तक्रार निकाली काढण्यात आली आहे असे उत्तर दिले होते. पालिका प्रशासनाने चक्क पंतप्रधान कार्यालयालाही खोटी माहिती देऊन फसविल्याचे प्रकरण समोर आल्याचा दावा गाडे यांनी केला.
बुजविलेल्या ओढे नाल्यासंदर्भात महापालिकेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.यासंदर्भात मला कुठलेही पत्र मिळालेले नाही. असे असतानाही महापालिकेने चक्क पंतप्रधान कार्यालयाला खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप गाडे यांनी सभागृहात केला.
हे ही वाचा : Hasan Mushrif : रुग्णांच्या हक्काचं घर हसन मुश्रीफांचा मुंबईतील सरकारी बंगला सोडताना रुग्णांना अश्रु अनावर
या प्रकरणावरती मनपा अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय. पावसामुळे नगर शहरात मोठ्या प्रमाणात पाणी असतं असे असतानाही ओडे नाले बुजवणाऱ्या बिल्डरांना आशीर्वाद कुणाचे हा प्रश्न उपस्थित होतो.
योगीराज गाडी नगरसेवक शिवसेना